नवी दिल्ली, 1 एप्रिल : तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना साथ आटोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांनी कोरोना निर्बंध पूर्णपणे हटवले असून, दिल्ली आणि महाराष्ट्रात मास्क (Corona Case) लावण्याची देखील गरज नाही. याआधी दिल्लीत मास्क घालणे अनिवार्य होते आणि त्याचे उल्लंघन केल्यास 2000 रुपये आणि नंतर 500 रुपये दंड आकारण्यात येत होता. देशातील कोविड-19 प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत असताना कोरोना निर्बंध शिथिल केले जात आहे. मात्र, निर्बंध पूर्णपणे काढून टाकणे हे घाईचे होईल, असा सल्ला देशातील तज्ज्ञांनी दिला आहे. लोकांनी मास्क वापरत राहावे, असे त्यांनी म्हटले आहे. याच्या मदतीने कोरोना व्हायरस, इन्फ्लूएन्झा आणि स्वाइन फ्लूसारखे इतर संसर्ग टाळता येऊ शकतात.
देशातील प्रख्यात विषाणूशास्त्रज्ञ टी जेकब जॉन म्हणाले की, भारतातील साथीचा रोग संपला असल्याने, SARS-CoV-2 चे संक्रमण कमी करण्यासाठी मास्क वापरण्याची गरज नाही. पण, सार्वजनिक ठिकाणी ऐच्छिक मास्क परिधान करण्यास प्रोत्साहित करणे ही चांगली कल्पना आहे. यामुळे धूळ आणि टीबी, फ्लू विषाणू, इतर श्वसन विषाणू, एडेनोव्हायरस, सामान्य सर्दी विषाणू इत्यादींसह इतर संक्रमण कमी होऊ शकतात. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च सेंटर ऑफ अॅडव्हान्स्ड रिसर्च इन व्हायरोलॉजीचे माजी संचालक जॉन म्हणाले की, मास्क घालण्याच्या सवयीमुळे आजार कमी होतील. सध्या किडनी प्रत्यारोपणाचे रुग्ण मास्क घातलेले दिसतात; पण मास्क घातल्याने सर्वांनाच फायदा होईल. बस, ट्रेन, विमान इत्यादींमध्ये मास्क घालावे.
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, IPL दरम्यान 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मिळणार प्रवेश
मास्क घालणे अनिवार्य असले पाहिजे
व्हायरलॉजिस्ट टी जेकब जॉन म्हणाले की, सर्व रुग्णालयाच्या आवारात, बाह्यरुग्ण दवाखान्यात आणि सर्व रांगा आणि प्रतीक्षालयांमध्ये मास्क घालण्याची सक्रिय जाहिरात व्हायला हवी हे माझे वैयक्तिक मत आहे. कर्मचारी आणि रुग्ण, नातेवाईक, अभ्यागत इत्यादींनी मास्क घालावे. फरिदाबाद येथील फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमधील फुफ्फुसशास्त्र विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. रविशेखर झा म्हणाले की मास्क घालणे अनिवार्य असले पाहिजे आणि ही सवय कायम ठेवली पाहिजे. कोरोना नियम आणि मास्क पूर्णपणे सोडून देणे योग्य नाही. ते म्हणाले की जगभरात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही साथ अशी होती, जी आधुनिक जगाने यापूर्वी पाहिली नव्हती. कोरोना महामारीचे युग विसरता कामा नये. हे खरे आहे की भारतात जवळजवळ प्रत्येकाला लसीकरण केले गेले आहे. परंतु, ही लस संसर्गापासून संरक्षण देत नाही. संसर्ग प्राणघातक नसला तरी यामुळे अनेक महिने अशक्तपणा येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.