जाहिरात
मराठी बातम्या / देश / उद्धव ठाकरे सरकारची केरळकडे मदतीची हाक; कोरोना रोखण्यासाठी केली ही विनंती

उद्धव ठाकरे सरकारची केरळकडे मदतीची हाक; कोरोना रोखण्यासाठी केली ही विनंती

उद्धव ठाकरे सरकारची केरळकडे मदतीची हाक; कोरोना रोखण्यासाठी केली ही विनंती

केरळमध्ये आरोग्यमंत्र्यांच्या पुढाकाराकडे येथील कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात यश आलं आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 मे : राज्यातील कोरोना (Coronavirus) रुग्णांचा 50 हजारांचा आकडा पार केला. रविवारी आलेल्या आकडेवारीवरुन ही माहिती समोर आली आहे. लाखोंच्या दिशेने झेपावत असल्याने आता राज्य सरकारही धास्तावले आहे. त्यातच कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही 1635 पर्यंत जाऊन पोहचली आहे. या सगळ्यात राज्य सरकारने आता केरळ सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. कोरोनाशी यशस्वी लढा दिलेल्या डॉक्टर आणि नर्सेसना राज्यात पाठविण्याची विनंती राज्य सरकारतर्फे पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे. केरळमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात सरकार आणि यंत्रणेला आलेल्या यशानंतर, आता तोच प्रयोग महाराष्ट्रातही व्हावा, ही सरकारची इच्छा आहे.

News18

सध्या महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे ही शहरे कोरोनाच्या संसर्गासाठी चिंतेचा विषय ठरली आहेत. या शहरांतील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी केरळमध्ये कोरोनाशी मुकाबला करणारे हे डॉक्टर्स आणि नर्सेस उपयोगी ठरतील अशी सरकारला आशा आहे. भविष्यात मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये रुग्णांची वाढती संख्या रोखण्याचा सर्वोतपरी प्रयत्न सध्या राज्य सरकारकडून सुरु आहे. राज्यात आजही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलेल्या भाषणात संख्या वाढणार असल्याचे संकेत दिले होते. संख्या वाढणार असली तरी काळजीचं कारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. राज्यात आज 3041 रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 50 231 एवढी झालीय. तर आज 58 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत 1635 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे राज्यात आत्तापर्यंत 14 हजार 600 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. हे वाचा - घरी परतलेल्या प्रवासी मजुरांसांठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात