Home /News /national /

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी कोरोनाचा उद्रेक, 17 अधिकारी निघाले पॉझिटिव्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी कोरोनाचा उद्रेक, 17 अधिकारी निघाले पॉझिटिव्ह

कोविड प्रोटोकॉलनुसार या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांना कार्यक्रमाच्या तयारीची परवानगी दिली जाणार आहे.

    कुल्लू 01 ऑक्टोबर: हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यातल्या मनाली (Manali) इथे तयार झालेल्या बोगद्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या बोगद्याला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलं आहे. (Atal Tunnel Rohtang)  त्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narender Modi) 3 ऑक्टोबरला कुल्लू इथे पोहोचणार आहेत. त्याच्या तयारीसाठी आलेल्या विविध विभागांच्या 17 अधिकाऱ्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता अधिक काळजी घेण्यात येत आहे. या पॉझिटिव्ह अधिकाऱ्यांमध्ये 3 पोलीस कर्मचारी, 1 CID चे अधिकारी, 2 पर्यटन विभागाचे कर्मचारी, विविध सरकारी विभागांचे 11 ड्रायव्हर्स यांचा समावेश आहे. कोविड प्रोटोकॉलनुसार या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांना कार्यक्रमाच्या तयारीची परवानगी दिली जाणार आहे. काय आहेत या बोगद्याची वैशिष्ट्ये? हिमाचल प्रदेशातल्या लाहौल-स्पीती जिल्ह्यात मनाली-लेह महामार्गावर सर्वाधिक उंचीवर देशातला सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात आला आहे. BROच्या इंजिनिअर्सनी हा बोगदा तयार केला असून ते अतिशय आव्हानात्मक काम होतं. 'ये देखो आजका हिंदुस्तान' धक्काबुक्कीदरम्यान राहुल गांधींची उद्विग्न प्रतिक्रिया BROचे मुख्य इंजिनिअर ब्रिगेडियर के पी पुरूषोत्तमन यांनी याबाबत माहिती दिली आहे. समुद्र सपाटीपासून याची उंची 10,000 फुटांवर आहे. 9 किलोमीटरचा हा बोगदा आहे. त्याला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बोगद्याचं उदघाटन  करणार आहेत. 3 हजार 500 कोटींचा खर्चा त्यावर आला असून सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचं अंतर 46 किमीने कमी होणार आहे. आता हिवाळ्यातही हिमवर्षावानंतर या भागाचा जगाशी संपर्क तुटणार नाही. अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. Hathras Gang rape : राहुल गांधींना धक्काबुक्की; UP च्या पोलिसांकडून अटक हा बोगदा भारतीय इंजिनिअर्सच्या परिश्रमाचं एक उत्तम उदाहरण ठरणार आहे. हा बोगदा तयार करणे हे अतिशय अवघड असं काम होतं. प्रतिकूल निसर्ग आणि एवढ्या उंचीवर काम करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ याचं मोठी आव्हान होतं. ते सगळं आव्हान पार करत आता हा बोगदा तयार झाला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus, Narendra modi

    पुढील बातम्या