यावेळी यमुना एक्सप्रेस-वेवर राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या काही कार्यकर्ते व नेते होते. ते हाथरस येथे पीडित कुटुंबीयांना भेटीसाठी जात असताना अडविण्यात आले. हाथरसमध्ये 144 जमावबंदी लागू केल्यामुळे पुढे जाता येणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. हे ही वाचा-Hathras Gang rape : राहुल गांधींना धक्काबुक्की; UP च्या पोलिसांकडून अटक यावेळी राहुल गांधींनी मी एकटा जाणार असल्याचे सांगितले. मात्र तरीही त्यांना पुढे जाऊ दिलं नाही. तर त्यांंना धक्काबुक्की केली. यामध्ये राहुल गांधींची कॉलर पकडण्यात आली व ते खाली पडले. यादरम्यान राहुल गांधी मी पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्याशिवाय जाणार नसल्याचं सांगत होते. यावेळी सुरू असलेल्या गदारोळात 'ये देखो आज का हिंदुस्तान' असं ते समाजमाध्यमांना सांगत होते.#SUPEREXCLUSIVE राहुल के काफ़िले पर पुलिस लाठी चार्ज, कार्यकर्ताओं की धक्का-मुक्की, संतुलन बिगड़ने से गिर पड़े राहुल #Hathras #Visit #Victim #Family #RahulGandhi #PriyankaGandhi #Delhi #Section144 @gayatrisharma24 @amitviews pic.twitter.com/oNZ17koxSf
— News18 India (@News18India) October 1, 2020
या घटनेनंतर देशभरात मोठा गदारोळ झाला आहे. विविध नेत्यांनी या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.#WATCH Just now police pushed me, lathicharged me and threw me to the ground. I want to ask, can only Modi Ji walk in this country? Can't a normal person walk? Our vehicle was stopped, so we started walking: Congress leader Rahul Gandhi at Yamuna Expressway,on his way to #Hathras pic.twitter.com/nhu2iJ78y8
— ANI UP (@ANINewsUP) October 1, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul gandhi, Uttar pradesh