Home /News /national /

तमिळनाडूतील मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजारी, जोरदार वादानंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

तमिळनाडूतील मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजारी, जोरदार वादानंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

तमिळनाडूतील (Tamilnadu) अनेक मंदिरांमध्ये (temples) ब्राह्मण (brahmin) सोडून इतर जातीतील पुजाऱ्यांची (priest) नियुक्ती (appointment) करण्यात आल्यामुळे जोरदार वादाला (controversy) तोंड फुटलं आहे.

    चेन्नई, 18 ऑगस्ट : तमिळनाडूतील (Tamilnadu) अनेक मंदिरांमध्ये (temples) ब्राह्मण (brahmin) सोडून इतर जातीतील पुजाऱ्यांची (priest) नियुक्ती (appointment) करण्यात आल्यामुळे जोरदार वादाला (controversy) तोंड फुटलं आहे. काहींनी एम. के. स्टॅलिन (M. K. Stalin) सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तर अनेकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचं स्पष्टीकरण या मुद्द्यावरून तमिळनाडूतील वाद इतका वाढला की मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना विधानसभेत स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. कुठल्याही ब्राह्मण पुजाऱ्याला हटवण्यात आलं नसून रिक्त जागांवर ही नियुक्ती करण्यात आल्याचं स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. विविध मंदिरातील पुजाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून सर्व जातींना समान प्रतिनिधित्व मिळावं, हाच सरकारचा उद्देश असल्याचं स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. एखाद्या विद्यमान पुजाऱ्याची हकालपट्टी करून त्याच्या जागेवर नवी नियुक्ती झाल्याचा प्रकार घडलेला नसून तसे आढळून आले, तर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दिलं आहे. दिवंगत मुख्यमंत्री करुणानिधी यांनी केलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार या नियुक्त्या करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सर्व जातींना समान न्याय हिंदू धर्मातील सर्व जातींना समान न्याय मिळवून देणं, हा दिवंगत मुख्यमंत्री करुणानिधी यांचा उद्देश होता. त्यानुसार मंदिरातील पूजाअर्चा करण्याचं प्रशिक्षण दिल्यानंतरच विविध जातीतील पुजाऱ्यांची त्यासाठी नियुक्ती केली जात असल्याचं एचआरसीई मंत्री पीके सेकर बाबू यांनी म्हटलं आहे. त्यासाठीची कायदेशीर तरतूदच तमिळनाडूच्या कायद्यात असून या पुजाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जाणार असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे. हे वाचा -तुरुंगातला एक दिवस; कर्नाटकात मांडण्यात आली तुरुंग पर्यटनाची संकल्पना पुजाऱ्यांचा आरोप विविध मंदिरातील ब्राह्मण पुजाऱ्यांनी सोमवारपासून आपली सेवा सरकारने खंडित केल्याचा आरोप केला आहे. आपल्या जागी नवे पुजारी नेमल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर सरकारने हा आरोप फेटाळून लावला असून काही शक्ती जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत असल्याचं म्हटलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Tamil nadu, Temple

    पुढील बातम्या