डोकी एकमेकींना चिकटलेल्या अवस्थेत जन्माला आलेल्या या सयामी जुळ्या मुलींनी दहावीची परीक्षा दिली आणि त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
हैदराबादच्या या या दोन मुली वीणा आणि वाणी conjoined twins म्हणजे सयामी जुळ्या म्हणून जन्माला आल्या. डोक्याचा भाग एकमेकींना जोडलेला आहे.
10 कोटी रुपये खर्चून अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचा त्यांना सल्ला देण्यात आला होता. पण मेंदूतल्या बारिक पेशी आणि रक्तवाहिन्या गुंतल्यामुळे हे ऑपरेशन जीवघेणं ठरू शकलं असतं.
वीणा आणि वाणी यांच्या आई-वडिलांनी शेवटी मुलींना आहे त्या अवस्थेतच स्वीकारलं आणि त्यांना सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी प्रयत्न केले.
या वर्षी दहावीच्या परीक्षेला बसताना त्यांनी वेगवेगळे पेपर लिहिण्याची इच्छा व्यक्त केली. तेलंगण सरकारने त्यांना एकाच परीक्षा केंद्रावर पण वेगवेगळ्या कक्षातले हॉल तिकिट दिले.
तेलंगण बोर्डाचा निकाल नुकताच लागला. त्यात GPA 10 पैकी 9.3 points मिळवून वीणा पास झाली तर वाणीला 9.2 ग्रेड पॉइंड मिळाले.