मराठी बातम्या /बातम्या /देश /

Priyanka Gandhi: उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी प्रियंका गांधींची मोठी घोषणा, 40 टक्के तिकिट महिलांना देणार

Priyanka Gandhi: उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी प्रियंका गांधींची मोठी घोषणा, 40 टक्के तिकिट महिलांना देणार

उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी प्रियंका गांधींची मोठी घोषणा (File Photo: Reuters)

उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी प्रियंका गांधींची मोठी घोषणा (File Photo: Reuters)

Priyanka Gandhi's big announcement before Uttar PRadesh election: उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रियंका गांधींची मोठी घोषणा.

  • Published by:  Sunil Desale

लखनऊ, 19 ऑक्टोबर : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) आज पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी (Uttar Pradesh Assembly Election 2022) मोठी घोषणा केली आहे. उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दाही त्यांनी या पत्रकार परिषदेत मांडला. 'लडकी हूँ लड सकती हूँ'चा नारा देत प्रियंका गांधी यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष महिलांना 40 टक्के तिकिट देणार असल्याचं जाहीर केलं आहे. (Congress will give 40 % tickets to women in UP election)

प्रियंका गांधी म्हणाल्या की, मी महिलांना आग्रह करते की अधिकाधिक महिलांनी राजकारणात यावे. आम्ही आगामी निवडणुकीत 40 टक्के महिला उमेदवारांना तिकिट देणार आहोत. स्वतंत्र भारतात प्रथमच अशा प्रकारे एखाद्या पक्षाने महिलांसाठी इतकी मोठी घोषणा केली आहे.

15 तारखेपर्यंत करता येणार अर्ज

प्रियंका गांधी म्हणाल्या, आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागवले आहेत. पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत इच्छूक अर्ज करु शकतात. ज्यांना निवडणूक लढायची आहे त्यांनी अर्ज कारवा आम्ही त्यांना राजकारणात संधी देऊ. अधिकाधिक महिलांनी पुढे यावं.

वाचा : ... म्हणून गृहमंत्रिपद नाकारलं' जयंत पाटलांची कबुली

महिलांनी संघटित व्हावे

प्रियंका गांधी म्हणाल्या, माझी तर इच्छा आहे की 50 टक्के जागांवर महिलांना उमेदवारी दिली जावी. मी उत्तरप्रदेशची प्रभारी आहे म्हणून मी सध्या उत्तरप्रदेश बाबतचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय स्तरावर याबाबत नंतर विचार केला जाईल. राजकीय पक्षांना वाटते की, दोन हजार रुपये आणि सिलेंडर देऊन महिला खूष होतात पण राजकारणात अशाने बदल होणार नाहीत.

गुणवत्तेच्या आधारे महिलांना तिकिट देणार

आम्ही स्त्रिया आहोत. संघर्षात एकमेकांना साध देऊयात. विचार करा ही आपली बहीण आहे आणि आपण एकत्र उभ राहून लढले पाहिजे. जर कुणी आपल्या बहिणीला किंवा मुलीला उमेदवारी दिली तर त्यात काहीही चुकीचं नाहीये आणि नुकसानही नाहीये. महिला सक्षम आहेत. जातीच्या आधारावर नाही तर आम्ही गुणवत्तेच्या आधारावर आम्ही महिलांना तिकिट देऊ.

केंद्र आणि योगी सरकारवर टीकास्त्र

केंद्र आणि उत्तरप्रदेशातील योगी सरकारवर प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे. आता सत्तेच्या नावाखाली माणसांना चिरडले जात आहे. या प्रकारालाला महिला बदलू शकतात. राजकारणात तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून लढा. मी प्रसारमाध्यमांमधील मुलींना पाहते. देशाला धर्माच्या राजकारणातून बाहेर काढायचं आहे आणि पुढे न्यायचं आहे. महिला हे काम करु शकतात असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं.

First published:

Tags: Priyanka gandhi, Uttar pradesh, काँग्रेस