मराठी बातम्या /बातम्या /देश /

UP ELECTIONS: प्रियांका गांधींचं वचन काँग्रेसला पडतंय महागात; 40% महिला उमेदवारांसाठी वणवण सुरू

UP ELECTIONS: प्रियांका गांधींचं वचन काँग्रेसला पडतंय महागात; 40% महिला उमेदवारांसाठी वणवण सुरू

 उत्तर प्रदेश विधानसभा (Congress not getting female candidates in UP elections) निवडणुकीत महिलांना 40 टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन काँग्रेसच्या अंगलट येत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

  • Published by:  desk news

लखनऊ, 9 नोव्हेंबर: उत्तर प्रदेश विधानसभा (Congress not getting female candidates in UP elections) निवडणुकीत महिलांना 40 टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन काँग्रेसच्या अंगलट येत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. बेटी हू, लड सकती हू, अशी घोषणा देत काँग्रेसनं (Announcement to attract women voters) महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता इतक्या मोठ्या संख्येनं सक्षम उमेदवार निवडताना (Trouble in getting female candidates) काँग्रेसची दमछाक होत असल्याचं चित्र दिसत आहे.

काय होती घोषणा?

बेटी हू, लड सकती हू, अशी घोषणा काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी केली होती. काँग्रेस पक्षानं उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी जवळपास अर्ध्या लोकसंख्येला आकर्षित करून घेण्यासाठी महिलांना या निवडणुकीत 40 टक्के जागांवर उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात ही घोषणा राबवताना पक्षाची दमछाक होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

यादी पडली लांबणीवर

उत्तर प्रदेशात सर्वात अगोदर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याची योजना काँग्रेसनं आखली होती. उमेदवारांना आपापल्या मतदारसंघात प्रचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र प्रत्यक्षात अनेक जागांवर निवडून येण्यासाठी पात्र वाटतील, असे उमेदवारच मिळत नसल्याची पक्षाची अडचण आहे. त्यामुळे ही यादी लांबणीवर पडत असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसकडून स्पष्टीकरण

काँग्रेसनं मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. पक्षाकडं अनेक महिला उमेदवारीसाठी अर्ज करत असून अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळत असल्याचं पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. त्यातील योग्य उमेदवाराची निवड करण्याच्या प्रक्रियेत वेळ जात असल्यामुळेच यादीला उशीर होत असल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे.

हे वाचा-मुख्य सचिव बदलण्यासाठी CM नी लिहिलं अमित शहांना पत्र, हे आहे कारण

तीन दशकांपासून सत्तेबाहेर

उत्तर प्रदेशात गेल्या सुमारे तीन दशकांपासून काँग्रेस सत्तेबाहेर आहे. त्यामुळे पक्षाच्या संघटनावर परिणाम झाल्याचं चित्र आहे. इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसचं संघटन मजबूत नाही. त्यामुळे अनेक उमेदवार अगोदर इतर पक्षातून तिकीट मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. याच कारणामुळे काँग्रेसनं लवकर यादी तयार करण्याची तयारी केली असली, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणचे उमेदवार हे वेट अँढ वॉचचं धोरण स्विकारत असल्याचं चित्र आहे.

First published:

Tags: Uttar paredesh, Women, काँग्रेस