हिमांशू अग्रवाल (छतरपूर), 07 मे : मध्य प्रदेशातील मुरैनामध्ये गोळीबार झाल्याच प्रकार समोर आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता छतरपूरमध्ये घरी जाऊन एका तरुणाला बंदुकीने गोळीबार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान गोळीबारात कोणत्याही व्यक्तीला गोळी लागली नसल्याने जिवीत हाणी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मध्य प्रदेशातील नौगाव पोलीस ठाण्यातील बनछोरा गावाशी संबंधित आहे. काँग्रेस नेते महेंद्र सिंह यांनी गावातील तरुणाच्या घराबाहेर जाऊन परवानाधारक बंदुकीने गोळीबार करून दहशत पसरवल्याचा आरोप आहे.
…तर मी गळफास घेईन; पैलवानांनी केलेल्या गंभीर आरोपांवर बृजभूषण यांची प्रतिक्रियाकाँग्रेस नेत्याचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
यापूर्वीही जमिनीच्या वादातून घरावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता, ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे, छतरपूरचे एसपी अमित सांघी म्हणतात की, हवेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली अन् अडकलेल्या 4 जणांसोबत घडलं भयानकयाप्रकरणी नौगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असून त्यासोबतच परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिण्यात येत आहे.