मराठी बातम्या /बातम्या /देश /विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं अपयश; कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले...

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं अपयश; कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले...

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांची प्रतिक्रिया आली आहे. सिब्बल यांनी या निवडणुकीतील काँग्रेसचं अपयश पाहाता, पक्षानं स्वतःमध्ये डोकावून पाहाण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 06 मे : चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील विधानसभा निवडणुकीचे निकाल (Assembly Election 2021 Result) काही दिवसांपूर्वीच समोर आले आहेत. यावर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांची प्रतिक्रिया आली आहे. सिब्बल यांनी या निवडणुकीतील काँग्रेसचं अपयश पाहाता, पक्षानं स्वतःमध्ये डोकावून पाहाण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. कारण, बंगालमध्ये (West Bengal) काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, सोबतच आसाम आणि केरळमध्येही काँग्रेस अपयशी ठरलं.

सिब्बल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हटलं, की नुकतंच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस चांगलं प्रदर्शन करू शकलं नाही. काँग्रेस आसाम आणि केरळमध्ये अपयशी ठरलं. पश्चिम बंगालमध्येही पक्षाला एकही जागा मिळाली नाही. ते म्हणाले, आता पक्षाच्यावतीनं आवाज उठवण्यात येत आहे, तर याप्रकरणी विचार करणं गरजेचं आहे.

पुढे ते म्हणाले, की याबाबत ते आणखी काही प्रतिक्रिया देणार नाहीत, मात्र योग्यवेळी ते याबाबत बोलतील. ते म्हणाले, मी स्वतःचे विचार मांडेल, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनातून लोकांना वाचवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे.

देशातील कोरोना स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, की पंतप्रधानांनी असं म्हणायला पाहिजे, की महामारीविरोधातील हा लढा आपण जिंकू. निवडणूक वेगळी गोष्ट आहे मात्र सध्या लोक जीवन आणि मरणाशी संघर्ष करत असल्याचं चित्र आहे. सिब्बल यांनी पाचही राज्यांमधील काँग्रेसच्या पराभवाबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र, सध्या कोरोनाला अधिक प्राधान्य देण्.याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे नेते ममता बॅनर्जींना झाँसी की रानी का म्हणत आहेत, असा सवाल त्यांना केला गेला. याबाबत बोलताना ते म्हणाले, की जेव्हा पंतप्रधानांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली तेव्हा मी त्यांचंही अभिनंदन केलं. आपण विजय होणाऱ्या नेत्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. केंद्रानं बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी सर्वकाही प्रयत्न केले. निवडणूक आयोगानंही मदत केली. मात्र, तरीही ममता बॅनर्जी बहुमतानं विजयी झाल्या त्यामुळे त्यांना झाँसी की रानी म्हटलंच पाहिजे.

First published:
top videos

    Tags: Assembly Election 2021, Congress, West Bengal Election