जाहिरात
मराठी बातम्या / देश / नागपूरमध्ये गोंधळ, दिल्लीत 'झाडाझडती'; हायकमांडने नाना पटोले, केदार आणि राऊतांना बोलावले!

नागपूरमध्ये गोंधळ, दिल्लीत 'झाडाझडती'; हायकमांडने नाना पटोले, केदार आणि राऊतांना बोलावले!

 नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये  काँग्रेसच्या गोटात अभूतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला होता.

नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या गोटात अभूतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला होता.

नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या गोटात अभूतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 21 डिसेंबर : नागपूर स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत (Nagpur MLC election 2021) काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. या पराभवाची अखेर काँग्रेस हायकमांडने (Congress High Command summons) दखल घेतली आहे.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole), ऊर्जा मंत्री नितीन राऊत (nitin raut) आणि कॅबिनेट मंत्री सुनील केदार (sunil kedar) यांना समन्स बजावला आहे. तिन्ही नेते दिल्लीत दाखल झाले आहे. नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे हसू झाले. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसच्या गोटात अभूतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला. आधी रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली आणि शेवटच्या क्षणाला काढून घेतली. त्यानंतर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढावली. या प्रकरणी आता काँग्रेस हायकमांडने चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांना समन्स बजावला आहे. नागपुरात झालेल्या गोंधळाच्या मुद्यावर काँग्रेस हाय कमांडने समन्स दिला आहे. या तिन्ही नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. तिन्ही नेत्यांचा पायपोस एकमेकांत नसल्यामुळे खुलासा करण्यासाठी हे नेते दिल्लीत दाखल झाले आहे. या तिन्ही नेत्यांना या पराभवाबद्दल खुलासा करावा लागणार आहे. या पराभवामुळे राज्यात काँग्रेसचं हसू झाले त्यामुळे हायकमांडने तिन्ही नेत्यांना बोलावून घेतले आहे. या निवडणुकीमध्ये सुरुवातीला काँग्रेसने रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर अपक्ष मंगेश देशमुख यांना कॉंग्रेसने समर्थन दिलं. पण मतमोजणी जेव्हा झाली तेव्हा काँग्रेसमध्ये आयात केलेल्या या उमेदवाराला फक्त एक 1 मत मिळाले. तर चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, मंगेश देशमुख यांना 186 व छोटू भोयर यांना 1 मत मिळाले. भाजपविरोधात काँग्रेसचा हा सर्वात लाजिरवाणा पराभव ठरला आहे. त्यामुळेच आता दिल्लीत नेत्यांची झाडाघडती घेतली जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात