नवी दिल्ली 21 एप्रिल: संसदेतल्या लोकसभा सचिवालयात काम करणारा एक स्वच्छता कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. लॉकडाऊनपासून हा कर्मचारी ऑफिसला गेला नव्हता. काही दिवसांपासून त्याला ताप आणि खोकला झाला होता. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यामुळे त्याने टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
या कर्मचाऱ्याला मुलगाही संसद भवनात काम करतो. आता त्यांच्या घरातल्या सर्व 11 सदस्यांची चाचणी करण्यात येणार असून त्यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या आधी राष्ट्रपती भवन परिसरात काम करणारा एक कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता.
कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढत आहेत. आतापर्यंत रुग्णांची संख्या 18 हजारांच्या पलीकडे गेली आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांचा आकडा 18601 इतका आहे. या व्यतिरिक्त 590 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना रूग्णांची संख्या 17656 होती. त्याच वेळी, तोपर्यंत 559 लोकांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या मागील आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत कोरोना संसर्ग होण्याच्या नवीन प्रकरणांमध्ये 1336 रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली आहे. तर दिलासादायक बातमी अशी की उपचारानंतर 3252 लोक बरे झाले आहेत. निरोगी लोकांची संख्याही सतत वाढत आहे.
हे वाचा - कोरोनाग्रस्ताला कोरोनामुक्त रुग्णाच्या रक्ताची संजीवनी; प्लाझ्मा थेरेपी यशस्वी
मिळालेल्या माहितीनुसार, 24 तासांमध्ये मृतांच्या आकड्यांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या दिवसभरात 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत हा मृतांचा सगळ्यात जास्त आकडा समोर आला आहे. ही खरंतर सरकारची चिंता वाढवणारी बाब आहे. जगभरात या विषाणूमुळे 1,65,739 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 24 लाख लोक संक्रमित आहेत.
हे वाचा - कोरोनाचा पहिला रुग्ण ते लॉकडाऊनपर्यंत या 7 देशांमध्ये सगळ्यात सुरक्षित भारत
बहुतेक मृत्यू युरोपमध्ये झाले आहेत. उत्तर अमेरिकेत 43,369, आशियात 14,840, दक्षिण अमेरिकेत 3,850, आफ्रिकेत 1,128 आणि ऑस्ट्रेलियामध्ये 83 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये युरोपियन देशांमध्ये सर्वाधिक 23,660 जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यानंतर स्पेनमध्ये 20,852 मृत्यू, फ्रान्समध्ये 19,718, ब्रिटनमध्ये 16,060, बेल्जियममध्ये 5,828 आणि जर्मनीत 4,642 मृत्यू झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.