
IIT, IIM पासून UPSC पर्यंत सर्व स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीसाठी प्रसिद्ध अशी ओळख असलेल्या कोचिंग सिटी अर्थात कोटा या शहराचं नाव सध्या वेगळ्या कारणाने गाजत आहे. कोटापासून 4 किमी अंतरावर असलेल्या सोगरिया स्टेशनला सॅटेलाइट स्टेशन म्हणून विकसित करण्यात आलं आहे.

सुमारे 4 कोटी खर्च करून सोगरिया स्टेशनला पूर्णपणे नवीन रूप देण्यात आलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी नुकतंच कोटाच्या सोगरियाच्या सॅटेलाईट रेल्वे स्टेशनचे काही फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले होते. सोगरिया रेल्वे स्टेशन मुख्य रेल्वे स्टेशनपासून 3 किमी अंतरावर आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर हे फोटो पोस्ट करताना कोटातील नव्यानं विकसित होणाऱ्या सॅटेलाईट कोचिंग स्टेशनची माहिती दिली होती.

त्याचबरोबर आता रेल्वे मंत्रालयानंही आपल्या ट्विटर हँडलवर सोगरिया स्टेशनची काही छायाचित्र शेअर करताना लिहिलं हे स्टेशन अगदी महालासारखं असणार आहे.

आता या सॅटेलाईट रेल्वे स्टेशनचं फूट-ओव्हर ब्रिज, क्रूझ एरिया, फेस लाईट, नवीन स्टेशन बिल्डिंग, कव्हर ओव्हर शेड इत्यादींचं काम जवळपास पूर्ण झाले आहे.

हे स्टेशन कोटाच्या मुख्य जंक्शनपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आहे. त्याचं नाव सोगरिया रेल्वे स्थानक असून त्याचं सौंदर्य आता प्रत्येकाला भुरळ घालत आहे.




