चित्रकूट, 10 एप्रिल : मासेमारीसाठी पारंपरीक पद्धतींसोबत अनेक अत्याधुनिक अवजारांचाही वापर केला जातो. मासेमारीसाठी डायनामाईटचा वापर करणे एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाला स्फोटकांमुळे हात गमवावा लागला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी माणिकपूर सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथून गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
काय आहे घटना? माणिकपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नागर गावात ही घटना घडली आहे. राकेश पुत्र छेदी (रा. नागर, माणिकपूर) गावाजवळील नदीत मासेमारीसाठी गेला होता. मासे पकडण्यासाठी त्याने डायनामाइट सोबत नेले होते. स्फोटकाने मासे मारण्यासाठी नदीत फेकण्याचा प्रयत्नात असताना डायनामाइट हातातच फुटला. या स्फोटात तरुण गंभीर जखमी झाला. वाचा - प्रियकराच्या प्रेमात आंधळी झाली बायको, नवऱ्याला दिलं विष, त्या Videoने सत्य समोर जखमी तरुण रुग्णालयात भरती घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जखमी तरुणाला माणिकपूर येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल केलं. येथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, तरुणाची गंभीर परिस्थिती पाहात पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. वाचा - PM मोदी, अमित शाहंचे मॉर्फ फोटो आणि व्हिडीओ.. तक्रार करणाऱ्याचंही फेसबुक हॅक ग्वाल्हेर येथून आणली होती स्फोटके दुसरीकडे, जखमी तरुण राकेशने सांगितले की, तो ग्वाल्हेर येथील एका कंपनीत कामाला होता, तेथून घरी येताना त्याने स्फोटके आणली होती. ज्याचा वापर मासे मारण्यासाठी केला जात होता. या स्फोटकाचा त्याच्या हातामध्येच स्फोट झाला, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.