• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • सावधान! Koo App डाऊनलोड करताय? मग एकदा हे वाचाच

सावधान! Koo App डाऊनलोड करताय? मग एकदा हे वाचाच

मागच्या 7 दिवसांमध्ये Koo अॅप डाऊनलोड करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, अशातच आता समोर आलेली माहिती वाचून तुम्हीही हे अॅप डाऊनलोड करण्याआधी विचार कराल.

 • Share this:
  मुंबई 12 फेब्रुवारी : शेतकरी आंदोलनानंतर (Farmer Protest) झालेल्या काही ट्वीटनंतर सरकरानं ट्वीटरला (Twitter) काही अकाऊंटवर निर्बंध घालण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, ट्वीटरनं ते न पाळल्यानं याचा फटका ट्वीटरला बसला आहे. यानंतर मेड इन इंडिया असणाऱ्या  Koo अॅपच्या वापरकर्त्यांमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. मात्र, अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अॅपवरून यूजर्सचा डाटा लीक होत असल्याचा मोठा खुलासा झाला आहे. हे अॅप अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आत्मनिर्भर भारत अभिनायांतर्गत ट्वीटरला पर्याय म्हणून प्रमोट केलं आहे. मात्र, आता यात चायनीज फंडिंग असल्याचं समोर आलं आहे. यासोबतच यूजरचा डाटा लीक होत असल्याची माहितीही समोर येत आहे. एका फ्रेंच सिक्युरिटी रिसर्चरच्या म्हणण्यानुसार, koo हे अॅप सुरक्षित नाही. फ्रेंच सायबर सिक्युरिटी संशोधकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा कू अॅपवरून लीक केला जात आहे. वैयक्तिक डेटामध्ये वापरकर्त्याचा ईमेल आयडी, फोन नंबर, नाव, जेंडर आणि जन्मतारीख याचा समावेश आहे. रॉबर्ट बॅप्टिस्टे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करत कू अॅपचं चीनी कनेक्शन उघड केलं. त्यांनी हे अॅप सुरक्षित नसल्याचं सांगत एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. रॉबर्ट बॅप्टिस्टे (Robert Baptiste) फ्रेंच सिक्युरिटीचे संशोधक आहेत, ट्वीटरवर ते इलियट अँडरसन (Elliott Anderson) नावानं प्रसिद्ध आहेत. कू अॅपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अप्रमेय राधाकृष्ण आहेत. राधाकृष्ण यांनी सीएनबीसी टीव्ही 18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, की Shunwei यांची कंपनीत काही गुंतवणूक आहे. झिओमीशी जोडलेला शुनवेई (Shunwei )स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतो. मात्र, कू कंपनी स्वतःला पूर्णपणे स्वयंपूर्ण अॅप म्हणत आहे आणि कंपनीचं म्हणणं आहे, की शुनवेई लवकरच कंपनीमधून बाहेर पडेल आणि आपला हिस्सा विकेल. अनेक सरकारी विभाग Koo अॅपवर - या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच हे अॅप चर्चेमध्ये आहे. या अॅपचा वापर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद यांच्यासह अनेकांनी सुरू केला आहे. इतकंच नाही, तर यावर अनेक सरकारी विभागांचे अकाऊंटही आहेत. 7 दिवसात डाऊनलोडच्या संख्येत 10 पटीनं वाढ - मिळालेल्या माहितीनुसार, मागील सात दिवसांमध्ये अॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या 10 पटीनं वाढली आहे. Koo App आतापर्यंत सर्व प्लॅटफॉर्मवर मिळून 30 लाख वेळा डाऊनलोड केलं गेलं आहे. गूगल प्ले स्टोरवर डाऊनलोडची संख्या 10 लाखाहून अधिक दिसत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: