मराठी बातम्या /बातम्या /देश /

ममता बॅनर्जींच्या मुख्यमंत्री पदासमोरील मोठा अडसर दूर, भवानीपूर मतदारसंघातून लढवणार निवडणूक

ममता बॅनर्जींच्या मुख्यमंत्री पदासमोरील मोठा अडसर दूर, भवानीपूर मतदारसंघातून लढवणार निवडणूक

West Bengal Electon: नंदीग्राम मतदारसंघातून भाजप नेते शुवेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर, आता राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

कोलकाता, 21 मे: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly election) नंदीग्राम मतदारसंघातून भाजप नेते शुवेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर, आता राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata banerjee) भवानीपूर (Bhawanipur constituency) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवनिर्वाचित आमदार शोभन देव चटर्जी यांनी भवानीपूर विधानसभा मतदार संघातून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा पारंपरिक बालेकिल्ला आहे.

भाजप नेते शुवेंदु अधिकारी यांच्याकडून नंदीग्राममध्ये पराभव पत्करल्यानंतर, मुख्यमंत्री बनण्यासाठी ममता बॅनर्जी यांना घटनेनुसार सहा महिन्यांच्या आत कोणत्याही ठिकाणाहून निवडणूक जिंकून विधानसभेचं सभासद व्हावं लागेल. राजीनामा देण्यापूर्वी शोभन देव चॅटर्जी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना कोणत्याही विधानसभा जागेवरुन सहा महिन्यांच्या आत विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देत आहे. भवानीपूर याठिकाणी ममता बॅनर्जी निवडणुका निष्पक्ष पद्धतीनं जिंकू शकतील.

2011 साली तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेल्या सुब्रत बोक्शी यांनीही भवानीपूर मतदारसंघातून आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या होत्या. पुढे 2016 मध्येही त्या भवानीपूर येथून निवडून आल्या होत्या. मात्र, यावेळी दीदीनं नंदीग्राम येथून निवडणूक लढवली. ज्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

हे वाचा-मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी चिडल्या; उपस्थित होते 10 CM बोलले फक्त PM

घटनेत तरदूत काय आहे?

घटनेतील कलम 164 नुसार, जी व्यक्ती मुख्यमंत्री पदावर आहे. त्या व्यक्तीला शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत कोणत्यातरी मतदार संघातून विधानसभेत निवडून जाणं अनिवार्य आहे. सहा महिन्यांच्या आत संबंधित मंत्री निवडून येण्यास असमर्थ ठरला तर त्या मंत्र्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी 6 महिन्यांच्या आत कोणत्याही मतदार संघातून आमदार म्हणून निवडून यावं लागेल.

First published:

Tags: Assembly Election 2021, Cm west bengal, Mamata banerjee