कोरबा, 01 मार्च: छत्तीसगडमधील कोरबा (Korba Chhattisgarh) येथील एका दोन वर्षाच्या मुलीला 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन देण्यात आलं आहे. एसईसीएल (SECL) कर्मचाऱ्याची मुलगी असलेल्या सृष्टी राणीला दिल्लीतील एम्समध्ये (Delhi AIIMS) डॉक्टरांनी हे इंजेक्शन दिलं. दुर्मिळ आजाराशी झुंज देत असलेल्या सृष्टीसाठी परदेशातून 16 कोटी रुपयांचं झोलजेन्स्मा इंजेक्शन (Zolgensma Injection) मागवण्यात आलं होतं. वेळेत इंजेक्शन मिळाल्यामुळे कुटुंबियांसह तिचा जीव वाचवण्याच्या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वच नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सृष्टी राणीशी संबंधित सर्व बातम्या ठळकपणे दाखवून कुटुंबीयांची अडचण जबाबदार अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात न्यूज18 नं महत्त्वाची भूमिका बजावली होती.
एम्स रुग्णालयातील डॉक्टर शेफाली यांच्यासह इतर डॉक्टरांच्या या प्रक्रियेत हातभार लावला. एसईसीएलच्या (SECL) दीपिका प्रोजेक्टमध्ये (Deepika Project) ओव्हरमन (Overman) म्हणून काम करणाऱ्या सतीश कुमार रवी यांची दोन वर्षांची मुलगी सृष्टी राणी, ही दुर्मिळ स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी टाइप वन (Spinal Muscular Atrophy Type One) नावाच्या गंभीर आजारानं ग्रस्त आहे. तिला वाचवण्यासाठी 16 कोटी रुपयांच्या महागड्या इंजेक्शनची गरज होती. जेबीसीसीआयच्या (JBCCI) बैठकीत सृष्टीच्या उपचारांचा खर्च (Treatment Costs) कोल इंडियानं (Coal India) उचलावा, अशी मागणी करण्यात आली. कोल इंडिया व्यवस्थापनानं याबाबत गांभीर्य दाखवत सृष्टीच्या उपचारांसाठी 16 कोटी रुपये देण्याची मागणी मान्य केली.
हे वाचा-युक्रेनमधून 182 विद्यार्थी मुंबईत दाखल, भारतात पाऊल ठेवताच अश्रू अनावर
कुटुंबियांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
मुलीचा जीव वाचवण्यासाठी दिलेल्या इंजेक्शनमुळे आता सृष्टीचे वडील सतीश कुमार रवी यांना दिलासा मिळाला आहे. तिचं संपूर्ण कुटुंबदेखील आनंदी आहे. संपूर्ण कुटुंबानं सृष्टीचे प्राण वाचविण्यात योगदान देणाऱ्या दानशूर लोकांचे आभार मानले आहेत. सध्या सृष्टीची प्रकृती स्थिर असून काही दिवसांत तिला रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे वाचा-10 वर्षाच्या मुलाला 50 दात; काढण्यासाठी अडीच तास डॉक्टरांनी केले प्रयत्न अन्...
'स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी टाइप वन' हा एक दुर्मिळ आजार आहे. या आजारानं ग्रस्त असलेल्या बाळांचे स्नायू कमकुवत होतात, शरीरामध्ये पाण्याची कमतरता जाणवते, दूध पिताना व श्वास घेताना त्रास होतो. एकूणच या आजारामुळे बाळाच्या हालचालींमध्ये निष्क्रियपणा येतो. आतापर्यंत मेडीकल सायन्समध्ये झालेल्या संशोधनानंतर या आजारावर एकच उपचार आहे, ते म्हणजे झोलजेन्स्मा इंजेक्शन. 'नोव्हार्टिस' (Novartis) ही स्विस कंपनी हे इंजेक्शन तयार करते. हे इंजेक्शन एक प्रकारची जीन थेरेपी ट्रीटमेंट (Gene Therapy Treatment) असल्याचा दावा कंपनीनं केलेला आहे. याचा वापर एकदाच केला जातो. स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी आजारानं ग्रस्त असलेल्या दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हे इंजेक्शन दिलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatisgarh