जाहिरात
मराठी बातम्या / देश / गरीब शेतकऱ्याचा मुलगा, कॉलेजपर्यंत पायात नव्हती चप्पल, असा आहे के. सिवन यांचा प्रवास

गरीब शेतकऱ्याचा मुलगा, कॉलेजपर्यंत पायात नव्हती चप्पल, असा आहे के. सिवन यांचा प्रवास

गरीब शेतकऱ्याचा मुलगा, कॉलेजपर्यंत पायात नव्हती चप्पल, असा आहे के. सिवन यांचा प्रवास

डॉ. के. सिवन यांचं शिक्षण सरकारी शाळेत तामिळ माध्यमात झालं. ते सांगतात, ते कॉलेजमध्ये असताना शेतात वडिलांना मदत करायचे. या कारणामुळेच त्यांनी घराजवळच असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : इस्रोची चांद्रयान -2 मोहीम पूर्णत्वाला गेली नाही याची हुरहूर प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन जेव्हा पंतप्रधानांना निरोप देत होते तेव्हा त्यांना गहिवरून आलं. डॉ. के. सिवन यांच्या नेतृत्वाखाली भारताने चांद्रयान - 2 मोहिमेची सुरुवात केली. डॉ. सिवन यांनी इस्रोच्या इतिहासातले अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत. त्यांचा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. शेतकरी कुटुंबात जन्म डॉ. सिवन तामिळनाडूच्या शेतकरी कुटुंबातले आहेत. कठोर मेहनत आणि दृढ निश्चयाच्या बळावर ते एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले. के. सिवन यांचं शिक्षण सरकारी शाळेत तामिळ माध्यमात झालं. ते सांगतात, ते कॉलेजमध्ये असतानाही शेतात वडिलांना मदत करायचे. या कारणामुळेच त्यांनी घराजवळच असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.सिवन यांचे वडील उन्हाळ्यात आंब्यांचा व्यवसाय करत. त्यांच्याबरोबर तेही आंब्याच्या बागेत काम करायचे. गणितात 100 टक्के नंतर मात्र त्यांनी गणितात 100 टक्के गुण मिळवत बीएससी ची पदवी मिळवली. बालपणात चपला किंवा बूट न घालताच दिवस काढणारा हा मुलगा कधीतरी इस्रोचा प्रमुख होईल, अशी कुणी कल्पनाही केली नसेल. अगदी कॉलेजच्या दिवसांपर्यंत ते धोतरच घालायचे. जेव्हा ते मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी पँट घातली. सिवन यांनी 1980 मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी घेतली. 1982 मध्ये त्यांनी बंगळुरूच्या IISC मधून एअरोस्पेस इंजिनिअरिंग केलं. 1982 मध्ये इस्रोच्या कामाला सुरुवात IIT मुंबईमधून त्यांनी 2006 मध्ये एरोस्पेस इंजीनियरिंगमध्ये पीएचडी केली. ते 1982 मध्येच इस्रोमध्ये आले. त्यांनी PSLV उपक्रमात काम सुरू केलं. एंड टू एंड मिशन म्हणजेच मोहिमांची सुरुवातीपासून शेवटपर्यंत आखणी, मिशन डिझाइन, मिशन इंटिग्रेशन अँड अॅनॅलिसिस यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं.2018 मध्ये ते इस्रोचे अध्यक्ष झाले. याआधी ए. एस. किरणकुमार यांच्याकडे ही जबाबदारी होती. आता के. सिवन यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा आहे. चांद्रयान -2 या मोहिमेनंतर आता भारताच्या अंतराळ प्रवासाच्या पुढच्या टप्प्यासाठी के. सिवन यांचा अनुभव आणि मार्गदर्शन मोलाचं असणार आहे. ====================================================================================================================== VIDEO : Chandrayaan 2 : …अन् पंतप्रधान मोदींसह इस्रोच्या प्रमुखांना अश्रू अनावर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात