Home /News /national /

Heartbreaking..!घरातला कर्ता पुरुष गेला, धक्का सहन न झालेल्या आई आणि मुलीचाही मृत्यू

Heartbreaking..!घरातला कर्ता पुरुष गेला, धक्का सहन न झालेल्या आई आणि मुलीचाही मृत्यू

शुक्रवारी (20 मे) एकाचवेळी एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू (Three Deaths) झाल्यानं तारेवाला गावावर शोककळा पसरली.

पंजाब, 21 मे: असं म्हणतात 'कुटुंब' (Family) हा जगातील कुठल्याही व्यक्तीचा सर्वांत मोठा आधार (Support) असतो. कुटुंबसोबत असताना आपण कुठल्याही संकटाचा धैर्यानं सामना करू शकतो. आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती काही कारणास्तव घरापासून दूर गेली तर सुरुवातीचे अनेक दिवस आपलं मन सैरभैर झाल्याशिवाय राहत नाही. घरापासून दूर गेलेली व्यक्ती कधीनाकधी परत येईल, या आशेवर आपण असतो. मात्र, जर घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू (Death) झाला तर? कुटुंबातील इतर सदस्य हा धक्का सहन करू शकत नाहीत. काहीवेळा तर मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या मागे कुटुंबातील इतर लोकांनीही आपले प्राण सोडून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. पंजाबमधील (Punjab) फिरोजपूर (Firozpur) जिल्ह्यातील तारेवाला गावात अशीच हृदयद्रावक घटना घडली आहे. तारेवालामधील एका 55 वर्षीय व्यक्तीचा विजेचा धक्का (Electric Shock) लागून मृत्यू झाला. वृद्ध आईला मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही आणि तिनेही काही क्षणांतच जगाचा निरोप घेतला. वडील आणि आजीच्या मृत्यूची बातमी मिळताच 15 वर्षीय मुलीची प्रकृतीही बिघडली. धक्कादायक म्हणजे तिनेदेखील काही क्षणांतच अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी (20 मे) एकाचवेळी एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू (Three Deaths) झाल्यानं तारेवाला गावावर शोककळा पसरली. अमर उजालानं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तारेवाला गावचे रहिवासी असलेल्या जगतारसिंग यांचा मुलगा मंगतसिंग उर्फ मंगू (वय 55 वर्षे) शेती व्यवसाय करत होता. वडील नसलेले मंगतसिंग आपली आई, दोन मुली आणि एका मुलासह राहत होते. शुक्रवारी सकाळी घरात अंघोळ करताना मंगत सिंग यांचा मृत्यू झाला. ते घरातील पाण्याची मोटर (Water Pump) सुरू करून अंघोळ करत होते तेव्हा त्यांना विजेचा धक्का लागला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखलं केलं. प्राथमिक तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अभ्यास करणाऱ्या बहिणीला भावानं असा आणला वैताग; Video पाहणाऱ्यांना आली लहानपणीची आठवण मंगतसिंग यांचा मृतदेह घरी पोहोचताच त्यांची वृद्ध आई हरोबाई बेशुद्ध पडल्या. त्यांची खालावलेली स्थिती बघता त्यांनाही दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी त्यांनाही मृत घोषित केलं. एकाचवेळी आपली आपले वडील आणि आजीचा झालेला मृत्यू 15 वर्षांची लखविंदर कौर सहन करू शकली नाही. दोघांच्या मृत्यूनंतर लखविंदरची तब्येत बिघडली. गावकऱ्यांनी तिला तातडीनं रुग्णालयात दाखलं केलं. मात्र, तोपर्यंत तिचाही मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लखविंदर कौरच्या आईचंही दोन वर्षांपूर्वीच निधन झालेलं आहे. आता मंगतसिंग यांच्या घरात फक्त त्यांचा एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. ही दु:खद बातमी समजताच आमदार (MLA) जगदीप कंबोज गोल्डी (Jagdeep Kamboj Goldy) यांनी पीडित कुटुंबाला भेट दिली. मंगतसिंग, त्यांची आई हारोबाई आणि मुलगी लखविंदर यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Chandigarh, Punjab

पुढील बातम्या