#RIPSushmaJi: आई-वडिलांचा होता स्पष्ट नकार, तरीदेखील सुषमा स्वराज यांनी केला प्रेमविवाह

#RIPSushmaJi: आई-वडिलांचा होता स्पष्ट नकार, तरीदेखील सुषमा स्वराज यांनी केला प्रेमविवाह

सुषमा आणि स्वराज यांची प्रेम कहानी पंजाब विद्यापीठ चंदीगडच्या कायदा(लॉ)डिपार्टमेंटपासून सुरू झाली होती. त्यावेळी ते दोघे पहिल्यांदा भेटले आणि बघताच ते प्रेमात पडले.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 ऑगस्ट : भारतीय जनता पार्टीच्या धडाडीच्या नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी निधन झालं. सुषमा स्वराज या गेल्या 3 दशकांपासून मुख्य महिला म्हणून भाजपचा चेहरा होत्या. सुषमा स्वराज हुशार, नम्र आणि सामर्थ्यवान व्यक्तिमत्त्व, तसंच एक अतिशय प्रेमळ व्यक्ती होत्या. त्यांचा चैतन्यशील आणि उदार स्वभाव अशी त्यांची जगभर ओळख होती. अशा या साहसी सुषमा स्वराज यांनी प्रेमविवाह केला होता. तेदेखील अशा काळात जेव्हा तरुणींना पडद्यामागे ठेवण्यात यायचं.

सुषमा आणि त्यांचे पती स्वराज यांना विवाह करण्यासाठी अनेक अडचणी पार कराव्या लागल्या. कारण दोघांचेही कुटुंबीय विवाहासाठी तयार नव्हते. त्यावेळी तरुणींना पडद्याआड ठेवायचे अशा वेळी सुषमा स्वराज यांनी प्रेमविवाह करण्याची मागणी घरच्यांसमोर ठेवली होती. खरंतर, त्यावेळी प्रेमविवाह लांबच, होणाऱ्या नवऱ्याचा चेहराही पाहू नाही द्यायचे. पण म्हणून सुषमा स्वराज मागे नाही झाल्या. त्यांनी खूप प्रयत्न करून कुटुंबीयांना लग्नासाठी तयार केलं आणि स्वराज यांच्याशी विवाह केला.

कॉलेजमध्ये असताना स्वराज यांच्या प्रेमात पडल्या...

स्वराज कौशल असं सुषमा स्वराज यांच्या नवऱ्याचं नाव होतं. कॉलेजमध्ये असताना दोघांचंही एकमेकांवर प्रेम जडलं. 13 जुलै 1975 ला त्यांचा विवाह झाला. पती स्वराज कौशल हे सुप्रीम कोर्टामध्ये प्रसिद्ध वकिल होते. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी त्यांना देशातील सर्वात तरुण अ‍ॅडव्होकेट जनरल म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. स्वराज कौशल वयाच्या 37 व्या वर्षी मिझोरमचे राज्यपाल देखील झाले. 1990 ते 1993 या काळात त्यांनी हे पद भूषवलं.

पंजाब विद्यापीठ चंदीगडपासून त्यांच्या प्रेमाची सुरुवात...

सुषमा आणि स्वराज यांची प्रेम कहानी पंजाब विद्यापीठ चंदीगडच्या कायदा(लॉ)डिपार्टमेंटपासून सुरू झाली होती. त्यावेळी ते दोघे पहिल्यांदा भेटले आणि बघताच ते प्रेमात पडले. दोघांनमध्ये प्रेम झालं आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

VIDEO : सुप्रिया सुळेंच्या शंकांवर अमित शहांनी हे दिलं उत्तर

Published by: Renuka Dhaybar
First published: August 7, 2019, 7:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading