मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

सोन्याची बिस्कीटं दाखवून व्यापाऱ्याला 39 लाखांना लुटलं, मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं लावला छडा

सोन्याची बिस्कीटं दाखवून व्यापाऱ्याला 39 लाखांना लुटलं, मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं लावला छडा

मुंबईतील अंधेरी परिसरात स्वस्तात एक किलो सोन्याची बिस्कीटं देतो असं सांगून दोन जणांनी हैदराबादच्या एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 07 नोव्हेंबर : मुंबईतील अंधेरी परिसरात स्वस्तात एक किलो सोन्याची बिस्कीटं देतो असं सांगून दोन जणांनी हैदराबादच्या एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या संपूर्ण प्रकार पैसे दिल्यानंतर सोन्याची बिस्कीटं न आल्यानं उघडकीस आला. सोन्याच्या बिस्कीटांचं आमिष दाखवून दोन जणांनी हैदराबादमधल्या एका व्यापाऱ्याला 39 लाख रुपयांना लुटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी फिल्मी स्टाइलनं तपास करून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. नेमका काय घडला प्रकार? मुंबईच्या अंधेरी परिसरात दोन तरुणांनी सोन्याची 1 किलो बिस्कीटं स्वतात विकण्याचा डाव रचला. त्यांनी हैदराबादच्या एका व्यापाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढलं. त्यासाठी त्याला बिस्कीटं स्वस्तात देतो असं सांगून पहिली भेट झाली. या भेटीत सोन्याचं एक बिस्कीट तपासूनही पाहण्यात आलं. 5 हजार रुपये एका बिस्कीटाची किंमत सांगण्यात आली. बिस्कीट खरंच सोन्याचं आहे तपासल्यानंतर व्यवहार झाला. सुरुवातीला 4 लाख रुपये देण्यात आले आणि त्यानंतर उर्वरित रक्कम पाठवून देण्यात आली. हे वाचा-LICची बेस्ट पॉलिसी! दर महिन्याला मिळतील 36,000, एकदाच भरावा लागणार प्रीमियम रक्कम पोहोचून देखील 1 किलो सोन्याची बिस्कीटं मिळाली नाहीत त्यावेळी व्यापाऱ्याला शंका आली आणि त्याने आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. व्यापाऱ्याकडील असलेली माहिती आणि त्या आधारे पोलिसांनी आरोपींचा तपास सुरू केला. या तपासात सोन्याची बिस्कीटं नसून ती नुसतीच सोन्याचा मुलामा लावलेली असल्याचीही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तक्रारारदाराच्या 39 लाख रुपयांपैकी एक लाख रुपये आणि गुन्ह्यांत वापरलेली गाडी जप्त केली आहे. तर हैदराबादच्या व्यापाऱ्याला विकण्यासाठी आणेलेली एक किलो वजनाची ती बिस्किटे कमरपट्ट्यासहित पोलिसांनी आरोपींकडून जप्त केली आणि खोटी बिस्किटे दाखवून 39 लाख रुपयांचा व्यवहार केला होता हे आरोपींनी तपासात सांगितले.
First published:

Tags: Mumbai, Mumbai police

पुढील बातम्या