नवी दिल्ली 27 जून: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) करोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्येही काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन (Dexamethasone) औषध वापरायला परवानगी दिली आहे. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी हे औषध वापरलं जाणार आहे.
ब्रिटनमध्ये केलेल्या संशोधनात डेक्सामेथासोन औषध करोनावर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. डेक्सामेथासोन हे औषध प्रामुख्याने संधीवात, अॅलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपचारासाठी वापरले जाते. हे औषध करोनावर सुद्धा प्रभावी ठरत आहे. डेक्सामेथासोन हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. कोरोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात यावे असा सल्लाही WHO ने दिला होता.
नवरदेवाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू, हळदीला आलेल्या 90 पाहुण्यांची चाचणी
जुलै- ऑगस्टमध्ये कोरोना साथीचा (Covid-19) विस्फोट होण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रात COVID-19 चे रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टर आणि ICU बेड्सची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister Rajesh tope)यांनी दिली.
कोरोनानंतर आता दिल्लीवर दुसरं संकट, टोळधाडीने केला हल्ला; पाहा VIDEO
Coronavirus ची साथ अनलॉकनंतर सातत्याने वाढत आहे. पुढच्या आठवड्यात आता Unlock 2 अर्थात दुसऱ्या टप्प्यातल्या सूचना येणार आहेत. निर्बंध आणखी सैल होणार आहेत. त्यामुळे कोरोनारुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून WHO स्थानिक पातळीवरील तज्ज्ञांनी कोरोनाच्या मोठ्या लाटेची शक्यता पुढच्या वर्षात वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात या दृष्टीने अधिकचे वैद्यकीय तज्ज्ञ आणि ICU, व्हेंटिलेटर यांची सोय करण्यात येत आहे, असं टोपे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus