Home /News /national /

कोरोनानंतर आता दिल्लीवर दुसरं संकट, टोळधाडीने केला हल्ला; पाहा VIDEO

कोरोनानंतर आता दिल्लीवर दुसरं संकट, टोळधाडीने केला हल्ला; पाहा VIDEO

ही टोळधाड अतिशय विनाशकारी असून अख्ख शेत फस्त करण्याची त्यांची क्षमता आहे. एका टोळ समुहात सुमारे 8 कोटी टोळ असतात.

    नवी दिल्ली 27 जून: महाभयंकर कोरोना व्हायरसने राजधानी दिल्लीत (Delhi) कहर केला आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकार आणि प्रशासन त्याविरुद्ध लढत असतानाच दिल्लीवर दुसरं संकट आलं आहे. टोळधाडीने (locust attack) दिल्लीच्या काही भागात हल्ला केला आहे. हरियाणानंतर दिल्लीतल्या छतरपूर भागात हा हल्ला झाला असून हल्ल्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टोळधाडीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने तातडीची बैठक बोलावली आहे. दिल्ली जवळच्या 70 गावांमधल्या शेतकऱ्यांना टोळधाडीपासून वाचण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे अशी माहिती सरकारने दिली आहे. पाकिस्तानातू भारतात प्रवेश केलेल्या टोळ धाडेने अनेक राज्यांमध्ये आपला उपद्रव निर्माण केलाय.  ही टोळधाड अतिशय विनाशकारी असून अख्ख शेत फस्त करण्याची त्यांची क्षमता आहे. टोळ हे पिकासाठी  किती नुकसानकारक आहे, याचा अंदाज यावरून काढता येतो की एखादी टोळ एक चौरस किलोमीटरपर्यंत पोहोचली तर दररोज ते हजार ते दोन हजार लोकांना पुरणारं अन्न फस्त करू शकते. टोळ ज्या ठिकाणी पोहोचतात त्या ठिकाणी देखील प्रजनन होते. त्यांना वाळवंटातील जमीन प्रजननासाठी अधिक योग्य मानली जाते. हे टोळ जगातील सर्वात विनाशकारी स्थलांतरीत किटकांपैकी एक आहे. अनुकूल परिस्थितीत एका टोळ समुहात सुमारे 8 कोटी टोळ असतात. जो हवेनुसार १५० किमी पर्यंत प्रवास करू शकतो. टोळ त्याच्या मार्गाने येणारी सर्व प्रकारची पिके आणि नॉन पिके फस्त करून टाकतो. पिकांचे नुकसान केवळ प्रौढ टोळ नाही तर अर्भक टोळ देखील पिके फस्त करतात. या टोळीचा हल्ला भारतावर यापूर्वीही झाला आहे. हेही वाचा - नवरदेवाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू, हळदीला आलेल्या 90 पाहुण्यांची चाचणी एक टोळ दिवसातून २ ग्रॅम खातो परंतु त्याची संख्या इतकी जास्त असल्यामुळे ते शकडो एकर शेतातलं अन्न फस्त करू शकते.  हा वाळवंटातील कीटक आहे. महाराष्ट्रातील काही भागात याचा दुष्परिणाम जमविण्याची शक्यता आहे. टोळ किड्याचे जीवन चक्र चार महिने आहे. या काळात, प्रत्येक मादी प्रौढ झाल्यावर ८० ते १२० अंडी देते. अंडी दिल्यानंतर बाळ फडफड तयार करण्यासाठी १२ ते १४ दिवस लागतात. परंतु बाळ किडे जमिनीवर येण्यापासून पिकांंचं नुकसान करू लागतात.  दीड महिन्यात टोळ प्रौढ होतो आणि दोन महिन्यांत प्रजनन सुरू करतो. २७ वर्षांनंतर  टोळ किड्याचा सर्वात मोठ्या हल्ल्यानंतर भारतात टोळांचा हल्ला झाला आहे. परंतु २७ वर्षानंतर हा टोळांचा सर्वात मोठा हल्ला आहे. यापूर्वी १९९३ मध्ये टोळ किड्याने अनेक राज्यांवर हल्ला करून कोट्यावधी रुपयांच्या पिकाचे नुकसान केले. अनेक दशकांपासून  भारतावर टोळ किड्याच्या हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. १९२६ ते १९३१ या काळात दहा कोटी रुपयांचे पीक वाया गेले होते.
    First published:

    Tags: Coronavirus, New delhi

    पुढील बातम्या