• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • निवडणूक निकालानंतर बंगालमध्ये उफाळला हिंसाचार; चौकशीसाठी केंद्रानं गठित केली समिती

निवडणूक निकालानंतर बंगालमध्ये उफाळला हिंसाचार; चौकशीसाठी केंद्रानं गठित केली समिती

केंद्रीय गृह मंत्रालयानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना बंगालमधील हिंसाचाराबाबत विस्तृत रिपोर्ट मागितला होता. तर, यानंतर आता सरकारनं यासाठी एक समितीही गठीत (Center Constituted a Committee for Inquiry ) केली आहे.

 • Share this:
  कोलकाता 06 मे: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा निकाल (West Bengal Assembly Election Result) जाहीर होताच हिंसेच्या घटनांमध्ये (Political violence in Bengal) प्रचंड लाढ झाली आहे. ही बाब केंद्र सरकारनं आता गांभीर्यानं घेतली आहे. आधी केंद्रीय गृह मंत्रालयानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना याबाबत विस्तृत रिपोर्ट मागितला होता. तर, यानंतर आता सरकारनं यासाठी एक समितीही गठित (Center Constituted a Committee for Inquiry ) केली आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय गृह मंत्रालयानं पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर झालेल्या कथित हिंसेच्या कारणांची चौकशी करण्यासाठी आणि राज्यातील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी चार सदस्यीय समिती गठित केली आहे. मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली हे पथक पश्चिम बंगालला रवाना झालं असल्याचं अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलं. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी पश्चिम बंगाल सरकारला स्पष्टपणे सांगितलं होतं, की राज्य सरकारने अहवाल पाठविला नाही तर या प्रकरणात गांभीर्याने विचार केला जाईल. अधिकाऱ्यांच्या मते, राज्य सरकारला वेळ न गमावता अशा घटना रोखण्यासाठी पावले उचलण्यासही सांगितले गेले आहे. बंगालमधील कथित हिंसाचारात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गृह मंत्रालयाने बुधवारी पाठवलेल्या निवेदनात पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना सांगितलं की, राज्यात निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराबाबत तातडीचा ​​अहवाल मागविण्यात आला होता. पश्चिम बंगाल सरकारने अद्याप अहवाल पाठविला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या पत्रात म्हटलं आहे, की ताज्या माहितीनुसार पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटना थांबल्या नाहीत आणि याचा अर्थ असा आहे की राज्य सरकारने त्याच्या नियंत्रणासाठी प्रभावी पावले उचललेली नाहीत. पत्रात म्हटलं आहे, की वेळ वाया न घालवता या घटना रोखण्यासाठी तातडीची पावले उचलण्याची गरज आहे. याचा सविस्तर अहवाल तातडीने गृह मंत्रालयाकडे पाठवावा, असं त्यात म्हटलं गेलं आहे. र राज्य सरकारने अहवाल पाठविला नाही तर या प्रकरणाचा गांभीर्याने विचार केला जाईल, असंही यात स्पष्ट केलं गेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपनं अनेक प्रयत्न करुनही ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा तृणमूल काँग्रेसनं बहुमत मिळवलं आहे. मात्र, निवडणुकीचा निकाल जाहीर होताच बंगालमधून हिंसाचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात मंगळवारपर्यंत राज्यातील विविध भागात किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: