जाहिरात
मराठी बातम्या / देश / ग्राहक बनून आले अन् लुटमार करून गेले; 40 लाखांच्या चोरीचा LIVE VIDEO

ग्राहक बनून आले अन् लुटमार करून गेले; 40 लाखांच्या चोरीचा LIVE VIDEO

ओडिशा बँकेत दरोडा

ओडिशा बँकेत दरोडा

ग्राहकांचं सोंग घेऊन बँकेत टाकला दरोडा, पैसे आणि दागिन्यांसह 40 लाख लुटले, पाहा VIDEO

  • -MIN READ Odisha
  • Last Updated :

बालासोर : भरदिवसा दरोडेखोरांनी बँकेत घुसून अधिकाऱ्यांना धमकवून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी दरोडेखोरांनी एका बँकेत लूट केली. विशेष म्हणजे बँक कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं आणि त्यांनंतर हे दागिने लुटले. ही घटना ओडिशा इथल्या बालासोर जिल्ह्यातील जलेश्वर भागातील चंदनेश्वर युनियन बँकेच्या शाखेत घडल्याची माहिती मिळाली आहे. बँकेत मोठ्या प्रमाणात दरोडा पडल्याने अनेकांना धक्का बसला आहे. ५०० रुपयांपर्यंतची रोकड असल्याचा आरोप आहे. 30 ते 40 लाख रुपयांचा ऐवज लुटला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने लुटले.

News18लोकमत
News18लोकमत

सात ते आठ दरोडेखोरांनी बँकेत ग्राहक असल्याचे भासवून प्रवेश केला आणि त्यानंतर दरोडा टाकला. यावरून असंच समोर येत की अनेक दिवसांपासून दरोड्याची योजना आखली जात होती. ग्राहक आणि बँक कर्मचाऱ्यांना धमकावून एकाला ओलीस ठेवून त्यांची लूट केली.

OMG! राजकुमारची 18 लाखांची आलिशान गाडी गाढवांनी ‘पळवली’; नेमकं प्रकरण काय पाहा VIDEO

ओडिशा के बालासोर में बदमाशों ने 40 लाख रुपये लूटे दरोड्यानंतर ते फरार झाले असून पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने त्यांचं शोध घेत आहेत. भोगराई पोलिसांनी बँक कर्मचाऱ्याची सुटका केली. जलेश्वर एसडीपीओ घटनास्थळी पोहोचले असून ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 19 एप्रिल 2023 रोजी ओडिशातील बालासोर जिल्ह्यात चंडी देवीचे मंदिर लुटण्यात आले होते. देवीचे दागिने चोरीला गेले.

रिअल लाइफ 3 Idiots! आग लागली, लाइट गेली, तरी डॉक्टरांनी असा वाचवला रुग्णाचा जीव
जाहिरात

बालासोर भागात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. याआधी एक लाख रुपये लुटल्याची घटना 18 एप्रिल रोजी समोर आली. सतत होत असलेल्या या दरोड्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बँकेतील दरोड्याचा CCTV समोर आला असून पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात