ब्रिटनचे PM जॉन्सन सोमवारपासून कार्यभार स्वीकारण्याची शक्यता; म्हणाले, यापुढेही हातमिळवणी करीत राहणार

ब्रिटनचे PM जॉन्सन सोमवारपासून कार्यभार स्वीकारण्याची शक्यता; म्हणाले, यापुढेही हातमिळवणी करीत राहणार

रुग्णालयातील प्रत्येक कोरोनाबाधिताशी मी हातमिळवणी केली आणि यापुढेही करीत राहीन, असं बोरिस म्हणाले

  • Share this:

लंडन, 26 एप्रिल : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Jhonson) कोविड 19 (Coronavirus) विरोधात लढा जिंकला आहे. त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाली असून पीएम जॉन्सन सोमवारपासून डाऊनिंग स्ट्रीट येथील पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.  ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब यांनी ही माहिती दिली. जॉन्सन यांना कोविड – 19 पॉझिटिव्ह आल्यानंतर डोमिनिक राब हा पदभार स्वीकारत होते.

ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, जॉन्सन हे पुन्हा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारण्यास अत्यंत उत्सुक आणि उत्साही आहेत. ते म्हणाले की, जॉन्सनच्या अनुपस्थितीत पंतप्रधान कार्यालय सांभाळणे हे एक मोठे आव्हान होते. परंतु एकजुटीने ते पूर्ण होऊ शकले. तसेच, डोमिनिक राब यांनी हे देखील स्पष्ट केले की, यावर्षी ब्रिटनमध्ये कोरोना लस येण्याची शक्यता नाही.

परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी सांगितले की, कोविड 19  आजाराविरूद्ध सरकारने गुरुवारपर्यंत एक लाख अँटी बॉडी टेस्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच कोरोनाची लस या वर्षापर्यंत उपलब्ध होणार नाही, असेही यात म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी ब्रिटनने कोरोना लसीची प्रथम क्लिनिकल मानवी चाचणी घेतली.

कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर पीएम जॉन्सन म्हणाले की, लोकांशी हातमिळवणी करणे थांबवणार नाही. त्यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, 'मला सांगायचे आहे की मी रूग्णालयात होतो, तिथे कोरोनाचे काही रुग्ण होते आणि मी सर्वांशी हातमिळवणी केली. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की मी पुढेही हात मिळविणी करीत राहीन.'

पंतप्रधान जॉन्सन कोरोनाव्हायरस संसर्गातून बरे झाल्यानंतर आराम करत होते. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कारभार स्वीकारण्यासंदर्भात अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहे. एका ब्रिटीश वृत्तपत्राने अगदी पंतप्रधान जॉन्सन यांना सोमवारपर्यंत काम सुरू करण्याचा दावाही केला आहे. पण डाऊनिंग स्ट्रीटचे प्रवक्ते यांनी सर्व चर्चांना पूर्णविराव देत म्हणाले, जॉन्सनला रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन दोन आठवड्यांहून कमी कालावधीत झाला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ते निर्णय घेतील.

बोरिस जॉनसन यांनी 23 मार्च रोजी ब्रिटनमध्ये 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आणि 26 मार्च रोजी ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला त्याला सेंट थॉमस रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना 12 एप्रिलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता.

संबंधित -लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी 3 लाख रु. केले खर्च, गावी पोलिसांना सांगितली हकीकत

First published: April 26, 2020, 4:16 PM IST

ताज्या बातम्या