Home /News /national /

Aadhaar-Voter ID linking: निवडणूक मतदार नोंदणीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Aadhaar-Voter ID linking: निवडणूक मतदार नोंदणीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Aadhaar-Voter ID linking

Aadhaar-Voter ID linking

केंद्रीय मंत्रिमंडळाने (central government) निवडणूक सुधारणा संबंधीच्या विधेयकांना मंजुरी दिली आहे.

    नवी दिल्ली, 16 डिसेंबर: केंद्रीय मंत्रिमंडळाने (central government) निवडणूक सुधारणा संबंधीच्या विधेयकांना मंजुरी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने तीन मोठे बदल केले आहेत. यामध्ये मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांक लिंक करण्याची तरतूद या विधेयकात (Aadhaar-Voter ID linking)करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तूर्तास आधार क्रमांक लिंक करणे ही बाब ऐच्छिक असणार आहे. निवडणूक आयोगाच्या शिफारशीच्या आधारे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मतदार ओळखपत्राशी आधार लिंक केल्याने बनावट मतदार कार्डांची हेराफेरी टाळता येईल. आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा गोपनीयतेचा अधिकार विचारात घेतला जाईल. निवडणूक आयोगाला अधिक अधिकार देण्यासाठी सरकार पावले उचलणार आहे. प्रस्तावित विधेयकामुळे देशातील तरुणांना दरवर्षी चार वेगवेगळ्या तारखांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. म्हणजेच मतदार होण्यासाठी आता वर्षातील चार तारखा कटऑफ मानल्या जाणार आहेत. आत्तापर्यंत केवळ दरवर्षी 1 जानेवारी रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षांच्या तरुणांनाच मतदार म्हणून नोंदणी करण्याची परवानगी आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी असलेल्या एक जानेवारीच्या मुदत तारखेमुळे अनेक युवकांना मतदान नोंदणीसाठी अडचणी येत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. एक जानेवारी ही तारीख असल्याने दोन जानेवारी व त्यानंतर वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदार नोंदणी करता येत नव्हती. त्यांना थेट पुढील वर्षाची प्रतिक्षा करावी लागत होती. नुकतेच, कायदा आणि न्याय मंत्रालयाने संसदेच्या एका समितीला सांगितले की, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 14B मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. जेणेकरून दरवर्षी मतदार नोंदणीसाठी चार तारखा असतील. यामध्ये 1 जानेवारी, 1 एप्रिल, जुलै आणि 1 ऑक्टोबर या तारखांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे नवीन मतदारांना नोंदणीसाठी वर्षभराची प्रतिक्षा करावी लागणार नाही. मार्चमध्ये तत्कालीन कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले होते की, एकाच व्यक्तीची दुबार मतदार नोंदणी करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने आधार क्रमांकाशी जोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जेणेकरून एकाच व्यक्तीची वेगवेगळ्या ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी होण्यास आळा घातला जाईल.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Aadhar card link, Election 2021, Voters choice

    पुढील बातम्या