• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • अच्छा, हे असं आहे तर! कॅब ड्रायव्हरच्या खुलाशानंतर ‘मारहाण Video’ प्रकरणात ट्विस्ट

अच्छा, हे असं आहे तर! कॅब ड्रायव्हरच्या खुलाशानंतर ‘मारहाण Video’ प्रकरणात ट्विस्ट

एका कॅब ड्रायव्हरला (Cab Driver) एक तरुणी मारहाण (Beating) करत असल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल (Viral Video) होत आहे. मात्र या घटनेत एका नवा ट्विस्ट (Twist) समोर आला आहे.

  • Share this:
    लखनऊ, 3 ऑगस्ट : एका कॅब ड्रायव्हरला (Cab Driver) एक तरुणी मारहाण (Beating) करत असल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल (Viral Video) होत आहे. मात्र या घटनेत एका नवा ट्विस्ट (Twist) समोर आला आहे. लखनऊमधील या घटनेत कॅब ड्रायव्हरला मारहाण करणाऱी तरुणी ही पोलिसांची खबरी (Informer of police) असल्याचा दावा कॅब चालकानं केला आहे. या तरुणीचं पोलिसांसोबत संगनमत असून आपल्याकडून पोलिसांनी 10 हजार रुपये उकळल्याचा दावाही त्यानं केला आहे. काय म्हणाला कॅब ड्रायव्हर आपलं काम संपवून आपण घरी चाललो असताना, ही घटना घडल्याचं कॅब ड्रायव्हरनं सांगितलं. घरी चाललो असताना वाटेत सिग्नल लागला म्हणून आपण गाडी थांबवून उभे होतो. तेवढ्यात ती तरुणी गाडीजवळ आली. खिडकीतून हात आत घालत तिने आपला शर्ट पकडला आणि मारामारी करायला सुरुवात केली. सुरुवातीला काय घडतंय, हेच कळेना. मी पूर्ण गोंधळून गेलो. माझा दोष तरी काय, असं मी तरुणीला विचारत होतो. या दरम्यान तरुणीनं आपल्या पाकिटातील 600 रुपये काढून घेतले. सलग 10 मिनिटं तिनं मारहाण केली. मात्र आपली चूक काय, याविषयी ती काहीच सांगत नव्हती. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेलं. तरुणाला अटक पोलीस स्टेशनला पोहोचताच पोलिसांनी मला लॉकअपमध्ये टाकलं. घटना समजल्यानंतर माझे दोन भाऊ मला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनला आले, तेव्हा त्यांनाही पोलिसांनी लॉकअपमध्ये टाकलं आणि तिघांवरही शांतता भंग केल्याचा गुन्हा नोंदवला, असं कॅब ड्रायव्हरनं सांगितलं आहे. तरुणीला मात्र पोलीस काहीही बोलले नाहीत आणि तिला घरी सोडलं. प्रियदर्शिनी नारायण उर्फ लक्ष्मी असं तरुणीचं नाव असून ती पोलिसांची खबरी असल्याची माहिती स्वतः कृष्णानगर पोलिसांनीच दिली असल्याचं कॅब ड्रायव्हर म्हणाला. हे वाचा -कॅब चालकाला मारहाण करणं 'त्या' महिलेला भोवलं; VIDEO समोर येताच पोलिसांची कारवाई सुटकेसाठी पैसे रात्रभर लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर पोलिसांनी सकाळी आमच्याकडून 10 हजार रुपये घेतले आणि मगच आमची सुटका केली, असं या कॅब ड्रायव्हरनं सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळाच ट्विस्ट मिळाला असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पोलीस आता या प्रकरणात काय खुलासा करतात, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
    Published by:desk news
    First published: