जाहिरात
मराठी बातम्या / देश / 10 हजारात सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची उलाढाल, वाचा भोपाळच्या गीतूची कहाणी

10 हजारात सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची उलाढाल, वाचा भोपाळच्या गीतूची कहाणी

10 हजारात सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची उलाढाल, वाचा भोपाळच्या गीतूची कहाणी

10 हजारात सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची उलाढाल, वाचा भोपाळच्या गीतूची कहाणी

अनेक लोक इच्छा असून देखील व्यवसाय करायला कचरतात. परंतु व्यवसायात येणाऱ्या सर्व आव्हानांना तोंड देत गीतू सैनी थॉमस यांनी स्वबळावर स्वत:चा व्यवसाय उभा केला आहे.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

भोपाल, 9 जुलै : अनेकांना त्यांच्या आयुष्यात बदल हवा असतो. दैनंदिन जीवनात नोकरी करणाऱ्या लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते परंतु यासाठी अनेक आव्हानांना नोंद द्यावे लागते. त्यामुळे अनेक लोक इच्छा असून देखील व्यवसाय करायला कचरतात. परंतु व्यवसायात येणाऱ्या सर्व आव्हानांना तोंड देत गीतू सैनी थॉमस यांनी स्वबळावर स्वत:चा व्यवसाय उभा केला आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे राहणारी गीतू व्यवसाय सुरू करण्यापूर्वी एका टेलिकॉम कंपनीत काम करत होती. नोकरीच्या काळातच त्यांचे लग्न झाले. त्यानंतर त्याला तेथील मसाल्यांची माहिती मिळाली. तिने नोकरी सोडली आणि पतीसोबत मसाल्यांच्या व्यवसायात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

News18लोकमत
News18लोकमत

केरळमधून अवघ्या 10,000 रुपये किमतीत सेंद्रिय मसाले खरेदी करून, इतर दुकानदारांपेक्षा कमी किमतीत बाहेरच्या बाजारात विकून त्यांनी आपला व्यवसाय उभा केला. आज त्यांचे  मसाले भोपाळशिवाय इतर भागातही पसंत केले जात आहेत. गीतूचे एकट्या भोपाळमध्ये 45 हजार ग्राहक आहेत आणि ती दरवर्षी 10 लाखांचा व्यवसाय करते. Viral Video : बाईक चालवत साबण लावून करत होते अंघोळ, पोलिसांनी पाहिलं आणि मग… गीतूने सांगितले की, 2018 मध्ये त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली, त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 10 हजार रुपये होते. बँकेकडून कर्ज न घेता, स्वतःच्या बचतीचा वापर करून त्यांनी अनेक आव्हानांना तोंड देत स्वत:चा व्यवसाय उभा केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात