आंध्र प्रदेश, 15 डिसेंबर : आंध्रप्रदेशमध्ये ( Andhra Pradesh) राज्य परिवहन महामंडळाची (andhra pradesh government bus) बस कालव्यात कोसळली आहे. या भीषण अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 20 प्रवासी गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( Bus crashes into canal in Andhra Pradesh)
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात अश्वरावपेटा ते जग्गारेड्डी गुडम दरम्यान असलेल्या मार्गावरुन जात असताना ही बस कालव्यात कोसळली. या बसमध्ये प्रवाशांची संख्या जास्त होती. अचानक चालकाने नियंत्रण सुटले आणि बस कालव्यात पडली. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. स्थानिक गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.
Andhra Pradesh: Nine people died after their bus fell into a rivulet in Jangareddygudem of West Godavari district. SP Rahul Dev Sharma says, "9 people died and 22 severely injured, out of the total 47 passengers on the bus”. pic.twitter.com/Dj6hruVXD7
— ANI (@ANI) December 15, 2021
काही प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. या अपघातात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच महिलासह चार मुलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. आणखी काही प्रवासी बेपत्ता असून शोधमोहीम सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.