मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

श्रेया बुगडेनं दिलेल्या गिफ्टमुळं कुशल बद्रिके आयुष्य पलटलं; असा आहे किस्सा..

श्रेया बुगडेनं दिलेल्या गिफ्टमुळं कुशल बद्रिके आयुष्य पलटलं; असा आहे किस्सा..

 कुशल बद्रिकेने नुकताच त्याच्या आणि श्रेया बुगडेचे मैत्रिचा एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्याने श्रेया बुगडेने दिलेल्या गिफ्टमुळे त्याचे आयुष्य कसं बदलले याचा किस्सा सांगितला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 15 नोव्हेंबर : झी मराठीवरील चला हवा येवू द्या या लोकप्रिय शोमधील कुशल बद्रिके( kushal badrike )आणि श्रेया बुगडे  (shreya bugd )तसेच भाऊ कदम यांच्यातील मैत्री नेहमी चर्चेत असते. या शोच्या माध्यमातून भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात. ऑफस्क्रीन असो की ऑनस्क्रीन ही तिघ धमाल करतान दिसते. सोशल मीडियावर देखील त्यांच्या मैत्रिचे काही किस्से तसेच व्हिडीओ शेअर करत असतात. कुशल बद्रिकेने नुकताच त्याच्या आणि श्रेया बुगडेचे मैत्रिचा एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्याने श्रेया बुगडेने दिलेल्या गिफ्टमुळे त्याचे आयुष्य कसं बदलले याचा किस्सा सांगितला आहे.

कुशल बद्रिकेने इन्स्टावर श्रेया बुगडेने दिलेल्या गिफ्टचे फोटो शेअर करत म्हटले आहे की,श्रेया बुगडे मी आणी योगायोग.आमच्या team मधे सगळ्यांना gift देण्याची आवड श्रेयाला, तीला फक्त त्यासाठी निमित्त लागतं. एकदा मला एक Wallet gift करुन म्हणाली या पुढे हे wallet तुला कधीच काही कमी पडू देणार नाही आणी खरच त्यानंतर कधी काही कमी पडलं नाही, मागच्या दिवाळीत एक घड्याळ देऊन म्हणाली “your time starts now” आणी ह्या दिवाळीत माझा नवा सिनेमा पांडू” येतोय. (3 December ला)मनापासून दिलेल्या शुभेच्छांच सोनं होतंच. माझ्या आयुष्याच सोनं करणारी ही, “बुगडे बाई” तुला खुप खुप प्रेम ❤️❤️❤️❤️..अशी काहीशी पोस्ट त्याने केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या अनोख्या मैत्रिचे आणि योगायोगाचे चाहत्यांकडू कौतुक होत आहे.

मागील काही वर्षांत कुशलने डावपेच, बायोस्कोप, रंपाट, लूज कंट्रोल, स्लॅमबूक, जत्रा, गावठी, झोलझाल, बारायण, भाऊचा धक्का, हुप्पा हुय्या, हिच्यासाठी कायपण सारखे अनेक हिट चित्रपट साकारले.

वाचा : अभिनेता सोनू सूदची बहिण निवडणुकीच्या रिंगणात, लढवणार निवडणूक

भाऊ आणि कुशलची जोडी प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. पांडू या चित्रपटात भाऊ कदम पांडू ही भूमिका साकारत असून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नखरेल उषाच्या तर लाडका कुशल महादू हवालदारच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial