Home /News /national /

5G च्या जमान्यात आत्ता कुठे सरकारी BSNL पोहोचलं 4G पर्यंत; मंत्रिमहोदयांनी पहिला कॉल करून केलं उद्घाटन

5G च्या जमान्यात आत्ता कुठे सरकारी BSNL पोहोचलं 4G पर्यंत; मंत्रिमहोदयांनी पहिला कॉल करून केलं उद्घाटन

भारतात सध्या 5G ची चर्चा सुरू असताना सरकारी (BSNL launches 4G services) टेलिकॉम कंपनी असणाऱ्या बीएसएनएलनं आत्ता 4G सेवा सुरु केली आहे.

    नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : भारतात सध्या 5G ची चर्चा सुरू असताना सरकारी (BSNL launches 4G services) टेलिकॉम कंपनी असणाऱ्या बीएसएनएलनं आत्ता 4G सेवा सुरु केली आहे. माहिती (IT minister makes first call) तंत्रज्ञान मंत्री अश्वनी वैष्णव यांनी पहिला कॉल करत या सेवेचं उद्घाटन केलं. Connecting India Faster अशी टॅगलाईन घेऊन कार्यरत असणारी ही कंपनी प्रत्यक्षात मात्र Faster ऐवजी सर्वात Slower असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे. यामुळेच ही कंपनी इतर कंपन्यांच्या स्पर्धेत टिकत नसल्याचं जाणकारांचं मत आहे. सुरू झाली 4G सेवा भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएननं आता 4G सेवा सुरू केली आहे. सरकारी कंपनीच्या प्रवासातील हा एक मैलाचा दगड मानला जात आहे. कंपनीकडं 4G सेवा नसल्यामुळे गेल्या काही वर्षात या कंपनीच्या ग्राहकांमध्ये कमालीची घट झाली होती. इतर कंपन्या लवकरात लवकरच 4G सेवा आपल्या कंपनीत सुरु करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत असताना इतकी वर्षं बीएसएनएलकडं 4G सुविधाच उपलब्ध नव्हती. आता ती उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्वनी वैष्णव यांनी दिली आहे. प्लॅन चांगले पण 4G नाही इतर मोबाईल कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे प्लॅन अधिक आकर्षक आणि स्वस्त आहेत. मात्र या कंपनीकडं 4G सेवा नसल्यामुळे ग्राहक पाठ फिरवत होते. सरकारी कंपनी असूनही खासगी कंपन्यांच्या तुलनेत ही कंपनी व्यावसायिकपणात कमी पडत असल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र तरीही या कंपनीच्या कार्यक्षमतेत सुधारणा होत नसल्याचा आरोप केला जातो. हे वाचा - विजेशिवाय चालणारा पहिला फ्रीज; किंमतही तुमच्या खिशाला परवडणारी देर आये दुरुस्त आए 4G च्या स्पर्धेत कंपनी उशिरा दाखल झाली असली तरी आकर्षक प्लॅनच्या मदतीनं ती लवकरच बाजारात पुन्हा एकदा आपलं अस्तित्व दाखवून देईल, असा विश्वास माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. मात्र पूर्ण जग आता 5G च्या प्रतिक्षेत असताना बीएसएनएलनं 4G सेवा लॉन्च केल्यामुळे जोरदार चर्चा रंगली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: BSNL, Telecom

    पुढील बातम्या