मराठी बातम्या /बातम्या /देश /भारताच्या हद्दीत घुसला पाकिस्तानी मुलगा, BSF नं आधी जेवू घातलं आणि मग....

भारताच्या हद्दीत घुसला पाकिस्तानी मुलगा, BSF नं आधी जेवू घातलं आणि मग....

बाडमेर (Barmer) सीमेवर आलेल्या निष्पाप पाकिस्तानी मुलाला  सीमा सुरक्षा दलाने (BSF) पाकिस्तानात परत पाठवलं. ही बातमी अधिक खास आहे, कारण बडमेरचा एक युवक गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात बंद आहे.

बाडमेर (Barmer) सीमेवर आलेल्या निष्पाप पाकिस्तानी मुलाला सीमा सुरक्षा दलाने (BSF) पाकिस्तानात परत पाठवलं. ही बातमी अधिक खास आहे, कारण बडमेरचा एक युवक गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात बंद आहे.

बाडमेर (Barmer) सीमेवर आलेल्या निष्पाप पाकिस्तानी मुलाला सीमा सुरक्षा दलाने (BSF) पाकिस्तानात परत पाठवलं. ही बातमी अधिक खास आहे, कारण बडमेरचा एक युवक गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात बंद आहे.

नवी दिल्ली 03 एप्रिल : चुकून बॉर्डर ओलांडून भारताच्या (India) बाडमेर (Barmer) सीमेमध्ये आलेल्या निष्पाप पाकिस्तानी मुलाला सीमा सुरक्षा दलाने (BSF) पाकिस्तानात परत पाठवलं. ही बातमी अधिक खास आहे, कारण बाडमेरचा एक युवक गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात बंद आहे. मात्र, भारतीय सीमा सुरक्षा दलाने या मुलाला केवळ सीमेपलीकडे पाठवलं नाही तर त्याच्या भोजनाची व्यवस्थाही केली. यानंतर फ्लॅग मीटिंग घेऊन त्यांनी पाकिस्तान रेंजर्सला बोलावले आणि त्यानंतर या निष्पाप मुलाला पाकिस्तानच्या स्वाधीन केले. पाकिस्तानच्या ताब्यात देते वेळी मुलाची तब्येतही चांगली होती.

देशाच्या बाडमेर जिल्ह्यातील सज्जन पारचा रहिवासी असलेला गमराराम सहा महिन्यांपासून पाकिस्तानी तुरुंगात आहे, परंतु पाकिस्तान त्याला परत करण्यासाठी काहीच करीत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार सायंकाळी पाच वाजता पाकिस्तानच्या करीमने भारतीय हद्दीत प्रवेश केला. चुकीनं भारताच्या सीमेमध्ये आलेल्या करीमला सीमा सुरक्षा दलानं मानवतेचं दर्शन घडवत भोजनही दिलं. यानंतर त्याला पाकिस्तानच्या स्वाधीन करण्यात आलं. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता आठ वर्षाचा पाकिस्तानी मुलगा करीम हा चुकून भारताच्या हद्दीत आला होता.

सीमेवर तैनात असलेल्या जवानांनी बालकाला भोजन देऊन त्याची चौकशी केली असता त्यानं स्वतःला पाकिस्तानी असल्याचं सांगितलं. यानंतर भारत- पाक जवानांमध्ये संध्याकाळी सात वाजता मीटिंग झाली. यानंतर या मुलाला पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आलं. बारमेर जिल्ह्यातील बीजराड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सज्जन येथील रहिवासी असलेला गेमराराम पाच नोव्हेंबरला रात्रीच्या आंधारात तारांच्या पलीकडे असलेल्या पाकिस्तानच्या हद्दीत गेला. पाकिस्तानच्या सीमेत जाताच सहा नोव्हेंबरला पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला पकडलं . पाकिस्तानी रेंजर्सनी भारताच्या बीएफएसच्या अधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती दिली आणि त्याला तुरुंगात बंद केलं. पाकिस्तानी रेंजर्सनी या गोष्टीची माहिती बीएसएफला तेव्हा दिली जेव्हा पाकिस्तानच्या हद्दीतून 84 बकरी भारताच्या हद्दीत आली. ही बकरी सीमेपार बारमेरमध्ये आल्यानंतर बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये संभाषण झालं. याच वेळी गेमराराम नावाचा एक युवक त्यांच्या ताब्यात असून तो सध्या तुरुंगात असल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर पाकिस्तानातून आलेली बकरी रेंजर्सकडे सोपवण्यात आली.

First published:

Tags: India, International, Young boy