जाहिरात
मराठी बातम्या / देश / प्रियकराच्या एका इशाऱ्यावर इंग्लंडवरुन भारत आली तरुणी, हिंदू धर्मानुसार केले लग्न; म्हणाली....

प्रियकराच्या एका इशाऱ्यावर इंग्लंडवरुन भारत आली तरुणी, हिंदू धर्मानुसार केले लग्न; म्हणाली....

प्रियकराच्या एका इशाऱ्यावर इंग्लंडवरुन भारत आली तरुणी, हिंदू धर्मानुसार केले लग्न; म्हणाली....

पालेंद्र सिंग एका खासगी कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांनी आपल्या प्रेमकथेबद्दल सांगितले की, ते कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॅनाच्या संपर्कात आले होते. खरं तर, त्या काळात पालेंद्र सोशल मीडिया अॅपवर पॉडकास्टद्वारे हिंदू धर्माशी संबंधित आपले विचार शेअर करत असत.

  • -MIN READ Agra,Uttar Pradesh
  • Last Updated :

आग्रा, 16 नोव्हेंबर : प्रेमात अनेक तरुणी-तरुणी आपल्या पार्टनरसाठी भरपूर गोष्टी करतात. अशाच प्रेमासाठी एक तरुणी थेट लंडनहून भारतात आली. ही लव्ह स्टोरी हॅना हॉबिट आणि पालेंद्र पाल सिंग यांची आहे. दोघांची दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली होती. या भेटीचे लवकरच प्रेमात रूपांतर झाले. दोघांनी आपल्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला. यानंतर ती आपल्या प्रियकरासाठी थेट सातासमुद्रापार करुन तब्बल चार हजार किमी अंतर कापून आग्रा येथे आली. आणि हिंदू रितीरिवाजांनुसार पालेंद्र आणि हॅनाचे लग्न झाले. पालेंद्र हे नागलागडी गावचा रहिवासी आहेत. सात फेरे घेतल्यानंतर हन्ना म्हणाली की, मी माझ्या पतीला प्रत्येक परिस्थितीत साथ देण्याचे वचन देते. हॅना आता भारतीय सूनेसारखी गावात राहते. घरकाम करायला शिकत आहे. राजेशाही सून मिळाल्याने कुटुंबही खूप आनंदी आहे. प्रेम शोधण्यासाठी हॅनाने आपला देश सोडला. मँचेस्टरची रहिवासी हन्ना सांगते की, इथल्या गावाचं वातावरण तिच्या शहरापेक्षा नक्कीच वेगळं आहे, पण ती परिस्थितीशी जुळवून घेईल. तसेच तिच्या प्रेमासाठी ती शेणाची गौऱ्याही बनवेल आणि गायीचे दूध काढायलाही शिकेल, असेही म्हणाली.

News18

नागला गढी येथे राहणारा पालेंद्र सिंग एका खासगी कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांनी आपल्या प्रेमकथेबद्दल सांगितले की, ते कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॅनाच्या संपर्कात आले होते. खरं तर, त्या काळात पालेंद्र सोशल मीडिया अॅपवर पॉडकास्टद्वारे हिंदू धर्माशी संबंधित आपले विचार शेअर करत असत. या दरम्यान ते हिंदू धर्माची आवड असलेल्या हॅनाच्या संपर्कात आला. व्यवसायाने परिचारिका असलेल्या हॅना आणि पालेंद्र यांनी नंतर इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवरही धर्माशी संबंधित विचारांची देवाणघेवाण सुरू केली. दरम्यान, त्यांची मैत्री फुलली आणि लवकरच प्रेमात रुपांतर झाले. सुमारे दोन वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनीही या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला. आपापल्या कुटुंबीयांना त्यांचा निर्णय सांगून त्यांची संमती घेतली. पालेंद्र संयुक्त कुटुंबात राहतात. त्यांचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी आहे. तर पालेंद्रचे मोठा भाऊ पोलंडमध्ये राहतात.

News18

या नात्याबद्दल दोन्ही कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. यानंतर पालेंद्रने हॅनाला इंग्लंडहून भारतात येऊन हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करण्यास सांगितले. हॅनाला भारतीय संस्कृतीशी खूप जवळीक आहे. यामुळेच ती आनंदाने आपला देश सोडून आग्रा येथे आली आणि पालेंद्रसोबत नागलाच्या श्री शक्ती मंदिरात त्यांनी लग्नाचे सात फेरे घेतले. गाठ बांधल्यानंतर, हॅना आणि पालेंद्र यांनी श्री शक्ती मंदिराचे महंत श्री विवेकानंद गिरीनाथ जी यांचे आशीर्वाद घेतले. हेही वाचा -  ब्रा घालून म्युझियममध्ये प्रवेश करत होती यू-ट्यूबर, पोलिसांनी तात्काळ… हॅना लवकरच भारतीय नागरिकत्वही घेणार आहे. हॅनावर भारतीय संस्कृतीमुळे खूप प्रभावित झाली आहे. इथल्या चालीरीती जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा ती पूर्ण प्रयत्न करत आहे. हिंदीही शिकत आहे. हॅनाची सासू सुभद्रा देवी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करते आणि स्वतःच्या हाताने अन्न शिजवून तिला खाऊ घालते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात