Home /News /mumbai /

'कोणालाच आरक्षण देऊ नका', ब्राह्मण संघटनेच्या या मागणीवर पवारांचे सडेतोड उत्तर, म्हणाले...

'कोणालाच आरक्षण देऊ नका', ब्राह्मण संघटनेच्या या मागणीवर पवारांचे सडेतोड उत्तर, म्हणाले...

यावेळी ब्राम्हण संघटना आणि पवारांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

    मुंबई, 21 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) हे ब्राह्मण विरोधी राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. दरम्यान अनेक राष्ट्रवादी नेत्यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा ब्राह्मण विरोधी झाल्याचं चित्र दिसत होतं. परिणामी शरद पवारांनी पुढाकार घेत ब्राम्हण संघटनांना चर्चेसाठी आमंत्रण दिलं होतं. यादरम्यान 20 ब्राह्मण संघटनांचे 60 प्रतिनिधी पवारांसोमर चर्चेसाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी महत्त्वाच्या तीन मुद्द्यांवर चर्चा केली. अखिल भारतीय ब्राम्हण संघाचे गोविंद कुलकर्णी म्हणाले... ब्राह्मण समाजाला सन्मानाने जगता यायला हवं, ही प्रमुख मागणी आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते जातीवाचक बोलतात असं यावेळी पवारांना सांगण्यात आलं. यावर आम्ही त्यांना समज देऊ असं पवारांकडून सांगण्यात आलं. ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली आहे. पवारांनी ब्राह्मण समाजाचं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या योगदान असल्याचं सांगून कौतुक केलं. पवारांचे दोन्ही गुरू ब्राह्मण असल्याचं त्यांनी सांगितलं. काही भाषणामुळे ब्राह्मण समाजामध्ये राग निर्माण झाला होता. समाज माध्यमांमध्ये चुकीचा विखारी प्रचार झाला. ही अस्वस्था दूर करणं हे नेत्याच काम म्हणून ही बैठक बोलावली. तणाव दूर करण्यासाठी, संवाद होण्यासाठी ही बैठक बोलावली होती. काय म्हणाले शरद पवार.. 1 कुठल्याही जातीच्या धोरणाविरोधात बोलू नये असं पक्षात सांगितलय. दुसरी मागणी अशी होती की, ग्रामीण भागातला वर्ग नागरी भागात येतो.  त्यामुळे नोकरीसाठी संधी मिळण्याची हमी हवी. राज्य आणि केंद्राची आकडेवारी मागवली होती. पण त्यात लोकसंख्येच्या प्रमाणत प्रतिनिधीत्व असल्याने आरक्षणाच सूत्र बसत नाही हे मी सांगितलं. 2 मग ते म्हणाले कुणालाच आरक्षण देऊ नका. त्यांना मी सांगितलं की, दलितांना गरिबांना आरक्षण द्यावं लागेल. ते मागास आहेत जोपर्यंत ते प्रगती करत नाहीत तोपर्यंत ही चर्चा करता येणार नाही. हे मत मांडल्यावर त्यांनी माझं काही चूक आहे असं सांगितल नाही किंवा त्यांचं धोरण बदललं असं ही सांगितलं नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mumbai, Reservation, Sharad pawar speech

    पुढील बातम्या