मराठी बातम्या /बातम्या /देश /प्रोटेक्शन वापरल्यानंतरही तरुणी गर्भवती, मूल नको असल्याने पोहचली कोर्टात, कारण, सांगितलं..

प्रोटेक्शन वापरल्यानंतरही तरुणी गर्भवती, मूल नको असल्याने पोहचली कोर्टात, कारण, सांगितलं..

गर्भनिरोधक उपाय वापरल्यानंतरही एक तरुणी गर्भवती राहिली आहे. मात्र, तिला हे मूल नको असल्याने ती मुंबई हायकोर्टात पोहचली. यावर कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

गर्भनिरोधक उपाय वापरल्यानंतरही एक तरुणी गर्भवती राहिली आहे. मात्र, तिला हे मूल नको असल्याने ती मुंबई हायकोर्टात पोहचली. यावर कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

गर्भनिरोधक उपाय वापरल्यानंतरही एक तरुणी गर्भवती राहिली आहे. मात्र, तिला हे मूल नको असल्याने ती मुंबई हायकोर्टात पोहचली. यावर कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 सप्टेंबर : मुंबईत गर्भनिरोधक उपाय फेल झाल्यामुळे एक अविवाहित तरुणी गर्भवती राहिली आहे. गर्भपात करण्यासाठी एमटीपीची परवानगी मिळावी यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने वैद्यकीय मंडळाची स्थापना केली असून महिलेला 26 आठवड्यांची गर्भधारणा वैद्यकीयदृष्ट्या संपुष्टात आणण्याची परवानगी दिली आहे. मात्र, यातील एक अट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आता तरुणीची यातून सुटका होणार की तिला मुलाला जन्म द्यावा लागणार? याचा निर्णय होणार आहे.

शुक्रवारी महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने निर्देश दिले की, ‘गर्भधारणा संपवण्याच्या वेळी मूल जिवंत होऊ शकत नाही, असे डॉक्टरांचे मत असेल तर याचिकाकर्त्याला गर्भधारणा संपवण्याची परवानगी आहे. महिलेची केस 20 ते 24 आठवड्यांसाठी MTP (सुधारणा), 2021 [Medical Termination of Pregnancy (Amendment) Act, 2021] अंतर्गत पात्र महिलांच्या श्रेणीमध्ये येत नसल्याने महिलेने (21) उच्च न्यायालयात धाव घेतली. तिची गर्भधारणा तिच्या जोडीदारासोबतच्या संमतीने झालेल्या संबंधांमुळे आणि गर्भनिरोधक उपकरण फेल झाल्यामुळे झाली. जेजे रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाच्या 8 सप्टेंबरच्या अहवालात गर्भ किंवा गर्भवती महिलेच्या शरीरात कोणतीही असामान्यता आढळून आली नाही.

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जेजे रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाच्या 8 सप्टेंबरच्या अहवालात म्हटले आहे की, गर्भात किंवा गर्भवती महिलेच्या शरीरात कोणतीही विकृती आढळलेली नाही. वैद्यकीय मंडळाने आपल्या अहवालात म्हटले आहे की गर्भधारणा सुमारे 26 आठवड्यांची आहे. या टप्प्यावर एमटीपीच्या परिणामी अकाली जन्मलेल्या बाळाची खूप काळजी घेण्याची आवश्यकता असेल. उच्च न्यायालयाने 13 सप्टेंबर रोजी वैद्यकीय मंडळाला महिलेच्या गर्भधारणेच्या कालावधीची पुनर्तपासणी करण्याचे निर्देश दिले. प्रत्यक्षात सोनोग्राफी अहवाल आणि वैद्यकीय मंडळाचे मत यातील तफावत लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची फेरतपासणी करण्यास सांगितले. वैद्यकीय मंडळाने 15 सप्टेंबर रोजी पुन्हा आपला अहवाल न्यायालयात पाठवला. त्यात महिला 25.4 आठवड्यांची गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या अहवालातही असेच म्हटले होते.

वाचा - #कायद्याचंबोला: मुलाला दोघांचही नाव देण्याची आईवडिलांची इच्छा! रुढी-प्रथांमुळे दीड वर्षानंतरही जन्म दाखला मिळेना

गर्भनिरोधक फेल झाल्यामुळे महिला गर्भवती

महिलेचे वकील अदिती सक्सेना यांनी कायद्याचे (एमटीपी कायदा) स्पष्टीकरण दिलं, की गर्भनिरोधक फेल झाल्यास किंवा कायदा अपयशी होत असेल तिथं गर्भधारणा संपुष्टात आणण्याची परवानगी आहे. वैद्यकीय मंडळाने अशा गर्भधारणेमुळे महिलेला होणाऱ्या वेदनांचा विचार करणे अपेक्षित होते, असा युक्तिवाद त्यांनी केला. न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि आरएम लड्ढा यांच्या खंडपीठाने सांगितले की, ते नक्कीच MTP ला परवानगी देतील. कारण गर्भनिरोधक फेल झाल्यामुळे हे घडले आहे. याचिकाकर्ता एक अविवाहित महिला आहे, जिचे तिच्या जोडीदारासोबत संमतीने संबंध होते. पण, वैद्यकीय मंडळाने आपल्या अहवालात असे म्हटले आहे की या एमटीपीमुळे मुलाचा अकाली जन्म होईल, याचीच फक्त चिंता आहे.

..तर त्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही

जन्माला आलेल्या मुलाची काळजी घेतली पाहिजे आणि अकाली जन्म झाल्यामुळे ते कोणत्याही शारीरिक विकृतीचा बळी ठरू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती म्हणाले की, जर डॉक्टर म्हणतात की मूल जिवंत होणार नाही, तर एमटीपीला परवानगी देण्यास आमची कोणतीही अडचण नाही. पीडितेला सहन करावे लागेल. त्याच वेळी, जिवंत बाळ जन्माला येण्याची शक्यता आहे, या वस्तुस्थितीकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. गर्भधारणा वेळेआधीच संपुष्टात आल्यास जन्मलेल्या मुलावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

First published:
top videos

    Tags: High Court, Pregnent women