जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आंघोळीसाठी थांबणे जीवावर बेतले, मित्राला वाचवताना दुसरा मित्रही गेला वाहून

आंघोळीसाठी थांबणे जीवावर बेतले, मित्राला वाचवताना दुसरा मित्रही गेला वाहून

गावोगावी जाऊन कापड विक्रीचा व्यवसाय करणारे दोन तरुण गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात वाहून गेल्याची घटना भंडाऱ्यात घडली

गावोगावी जाऊन कापड विक्रीचा व्यवसाय करणारे दोन तरुण गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात वाहून गेल्याची घटना भंडाऱ्यात घडली

गावोगावी जाऊन कापड विक्रीचा व्यवसाय करणारे दोन तरुण गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात वाहून गेल्याची घटना भंडाऱ्यात घडली

  • -MIN READ Bhandara,Bhandara,Maharashtra
  • Last Updated :

नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 01 सप्टेंबर : गावोगावी जाऊन कापड विक्रीचा व्यवसाय करणारे दोन तरुण गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात वाहून गेल्याची घटना भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या पवनी येथे घडली आहे. अंघोळीसाठी कालव्यात उतरले असता एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे नदी नाले तुटुंब भरू वाहत आहे, अशातच भंडारा जिल्ह्यातील पवनीमध्ये दोन जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. नईम खान लाल खान (22) आणि अमिन शहा लाल शहा (22) दोघे रा. अब्बुमियानगर, भांडेवाडी, नागपूर अशी वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह काही अंतरावर आढळून आला. मुळचे मध्यप्रदेशातील ग्वालियर येथील रहिवासी असून गत काही दिवसांपासून कापड व्यवसायाच्या निमित्ताने नागपुरात राहत होते. गावोगावी जाऊन कपडे विक्री करत असे. दरम्यान चौघेजण एका व्हॅनने पवनी इथं कापड विक्रीसाठी आले होते. निलज मार्गावरील गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याजवळ त्यांनी गाडी थांबवली आणि आंघोळीचा बेत आखला. आंघोळीसाठी नईम खान आणि अमिन खान उतरले. मात्र पाण्यात उतरल्यानंतर अंदाज न आल्यामुळे एक जण पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा गेला, मात्र कालव्यातील पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने दोघेही वाहून गेले. (जीव वाचवण्यासाठी ह्रदय घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचाच अपघात पुढे जे घडलं ते…) हा प्रकार व्हॅनमध्ये बसून असलेल्या त्यांच्या दोन साथीदारांच्या लक्षात आला. त्यांनी दोघांना वाचवण्यासाठी धाव घेतली. पण दोघे जण बरेच दूर पर्यंत वाहून गेले होते. त्यांनी आरडाओरडा करून मदतीसाठी याचना केली. त्यानंतर तत्काळ पवनी पोलिसांना सूचना दिली. लागलीच पवनी पोलीस घटना स्थळी दाखल होत शोध सुरू केला. यात त्यापैकी एकाचा मृतदेह काही अंतरावर आढळून आला असून दुसऱ्यांचा शोध अद्याप सुरू आहे. विशेष म्हणजे, आठवड्यातील ही दूसरी घटना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात