मलप्पूरम : उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने किंवा लाँग विकेण्ड पकडून अनेक जण फिरायला गेले होते. मात्र या वेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. पर्यटकांनी भरलेली नाव उलटून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यातील तनूरजवळ पर्यटकांची बोट उलटून 20 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन सकाळी तनूर दुर्घटनास्थळी भेट देणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे आज होणारे राज्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत. अपघाताच्या वेळी बोटीत सुमारे 40 लोक होते. राज्यमंत्री व्ही अब्दुरहमान यांनी माहिती दिली की केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा अपघात रात्री उशिरा झाला.
Malappuram boat accident: NDRF team deployed at the spot where a tourist boat capsized near Tanur in Malappuram district leaving atleast 21 people dead.#Kerala pic.twitter.com/tYGdd47IQU
— ANI (@ANI) May 7, 2023
Pained by the loss of lives due to the boat mishap in Malappuram, Kerala. Condolences to the bereaved families. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be provided to the next of kin of each deceased: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 7, 2023
अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी पोलीस आणि NDRF घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधार असल्याने बचाव कार्यात अनेक अडथळे देखील येत होते. बचावासाठी टॉर्च पेटवून लोकांचा शोध घेतला जात असल्याचे व्हिडिओमध्ये सोशल मीडियावरुन समोर आले आहेत.
At least nineteen people died after a #houseboat, which was ferrying tourists capsized in #Kerala’s #Malappuram. #PMModi announced an ex-gratia of Rs 2 lakh for families of the deceased#boat #accident #boataccident
— News18 (@CNNnews18) May 7, 2023
Read more here: https://t.co/pkf98EBQ8C pic.twitter.com/coqwHjapJ5
केरळमधील या घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.