मराठी बातम्या /बातम्या /देश /

आधी दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींचं केलं अपहरण, नंतर 5 तरुणांनी केली भयंकर अवस्था

आधी दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींचं केलं अपहरण, नंतर 5 तरुणांनी केली भयंकर अवस्था

दोन अल्पवयीन बहिणींचे अपहरण (Minor Girl Rape) करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

दोन अल्पवयीन बहिणींचे अपहरण (Minor Girl Rape) करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

दोन अल्पवयीन बहिणींचे अपहरण (Minor Girl Rape) करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

झारखंड, 23 डिसेंबर: झारखंडमधील साहेबगंज (Sahibganj) जिल्ह्यात दोन अल्पवयीन बहिणींचे अपहरण (Minor Girl Rape) करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनं झारखंड हादरुन गेलं आहे. ही घटना राधानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. गावातील पाच मुलांनी दोन्ही मुलींचे अपहरण करून बिहारमधील कटिहार आणि पूर्णिया येथे नेऊन सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याचा आरोप आहे.

पीडित मुलींच्या वडिलांनी 14 डिसेंबर रोजी राधानगर पोलीस ठाण्यात आपल्या मुली हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांनी सुदीप मंडल, अशोक मंडल, पप्पू मंडल आणि इतर दोन मुलांवर गुन्हा केल्याचा आरोप केला. कारवाई करत पोलिसांनी दोन्ही मुलींना बिहारमधील पूर्णिया येथून ताब्यात घेऊन त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले, त्यानंतर दोन्ही पीडित मुलींनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराची आपबिती पोलिसांना सांगितली.

हेही वाचा- 6 महिन्यानंतर सासरी पोहोचली पत्नी, Boyfriend च्या मदतीनं  केला पतीचा खेळखल्लास

मुख्य आरोपी सुदीप मंडल याच्या विरोधात राधानगर पोलीस स्टेशनचे प्रभारी कुंदन कांत विमल यांना लेखी अर्ज देऊनही पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचं पीडितेच्या वडिलांनी सांगितलं आहे. त्याउलट पीडित अल्पवयीन मुलींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोपी मुलाच्या बाजूने न्यायालयात 164 चे जवाब घेण्यासाठी धमकावून आणि वैद्यकीय तपासणी न करण्याची भीती दाखवून त्यांना सोडण्यात आले.

पीडितेच्या वडिलांकडून पोलिसांवर गंभीर आरोप

स्थानिक पोलिसांवर दडपशाहीचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. आरोपींना संरक्षण देणाऱ्या पोलीस स्टेशनच्या प्रभारींवर आणि अशा घटना करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी बुधवारी त्यांनी पोलीस अधीक्षक (एसपी ऑफिस) कार्यालय गाठले. मात्र पोलीस अधीक्षक (एसपी) अनुपस्थित असल्यानं त्यांनी मुख्यालयाचे डीएसपी यज्ञ नारायण तिवारी यांच्याकडे न्यायासाठी अर्ज केला.

हेही वाचा- ऑस्ट्रेलियन खेळाडूनं भर मैदानात केलं सहकाऱ्याला KISS, पाहा VIDEO 

या प्रकरणाबाबत, मुख्यालयाच्या डीएसपींनी पीडित अल्पवयीन मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांना आश्वासन दिले की, अशा घटनांमध्ये सामील असलेल्या सर्वांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच राधानगर पोलीस ठाण्याचे प्रभारीही याप्रकरणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.

First published:

Tags: Crime news, Gang Rape, Jharkhand