मराठी बातम्या /बातम्या /देश /

लोअर सर्किटनंतर शेअर बाजार सावरण्यास सुरुवात

लोअर सर्किटनंतर शेअर बाजार सावरण्यास सुरुवात

आज सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात पडझड होताना दिसत आहे.

आज सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात पडझड होताना दिसत आहे.

आज सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात पडझड होताना दिसत आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 13 मार्च : कोरोना व्हायरसनं (Corona Virus) जगभरात हाहाकार पसरला असताना व्यावसायासोबतच शेअर मार्केटवरही (Share Market) मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. एक तासासाठी शेअर बाजार ट्रेडिंग बंद झालं होतं. मात्र पुन्हा 10.05 मिनिटांनी शेअर मार्केट सावरण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल दोन तासांनी सेन्सेक्स 350 तर निफ्टी 60 अंकांनी वर आला आहे. आज सकाळी मार्केट सुरू होण्यापूर्वीच सेन्सेक्स (Sensex) तब्बल 2450 अंकानी घसरला होता. त्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स तब्बल 3140 अंकानी घसरला होता. आज सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्सच्या पडझडीचं सत्र सुरुच असल्याचं दिसत आहे. निर्देशांक 30 हजारांच्या खाली गेल्यानं शेअर मार्केटला सर्किट लागल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर निर्देशांक नियंत्रणाबाहेर गेल्याने शेअर बाजारातील ट्रेडिंग (Trading) थांबविण्यात आलं होतं. काल  सेन्सेक्स तब्बल 2500 अंकांनी आणि निफ्टी (Nifty) तब्बल 700 अंकानी घसला होता. आज सेन्सेक्स 3150 अंकांनी कोसळला असून निफ्टी 1000 अंकानी गडगडला होता. मार्केट बंद करण्यात आलं होतं, त्यानंतर 10.05 मिनिटांनी ते सुरू करण्यात आलं. शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची 5 कारणं कोरोना व्हायरस (Coronavirus): जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस साथीचा रोग असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. बहुतांश देशांवर याचा परिणाम झाला आहे. जगभरात 100 देशांना कोरोनाच्या संकटाने वेढलं आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढून 1 लाख 24 हजारांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 4 हजार 500 जणं मृत्यूमुखी पडले आहेत. वाहतुकीवर बंदी: भारतामध्ये कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात प्रवेश करण्यासाठी यापूर्वी देण्यात आलेले व्हिसा (Visa) रद्द करण्यात आले आहेत. 15 एप्रिलपर्यंत कोणत्याही विदेशी पर्यटकाला किंवा नागरिकाला भारतात प्रवेश दिला जाणार नाही आहे. (हे वाचा-सावधान ! मास्कनंतर आता हँड सॅनिटायझरही बनावट, कारखान्यावर छापा) भारतामध्ये आंतरराष्ट्रीय समुद्री वाहतुकीवर सुद्धा काही प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेने शुक्रवारी UK वगळता युरोपमधील सर्व प्रवाशांवर पुढील 30 दिवसांसाठी बंदी आणली आहे. यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. FII कडून सतत शेअर्सची विक्री: विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (Foreign institutional investors- FII) सतत भारतीय शेअर्सची विक्री करत आहेत. देशांतर्गत बाजारातून त्यांनी केवळ मार्च महिन्यामध्येच 20 हजार 831 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. बाँड मार्केटमध्ये अनिश्चितता :रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या काळात मांडलेल्या काही प्रतिकूल प्रस्तावांमुळे बाँड मार्केटमधील अनिश्चितता वाढली आहे. येस बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी आरबीआयने additional tier I (AT1) bonds चा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे म्युच्यूअल फंड्समध्ये गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ शकतं. जागतिक बाजारात वाढलेली शेअर्सची विक्री : आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री होत आहे. जपान बाहेरील एमएससीआयचा आशिया-पॅसिफिक शेअर्सचा विस्तृत निर्देशांक 3.2 टक्क्यांनी घसरला. या निर्देशांकाने गाठलेली हा निच्चांक आहे. तर जपानचा Nikkei 5.3 टक्क्यांनी कोसळला आहे. अमेरिकेतील बाजाराताही कोरोनाची भीती आहे.  Dow 1464 अंकांनी घसरला आहे. 500 ही 5 140.85 अंकानी घसरला आहे तर Nasdaq 392.20 अंकांनी घसरला आहे.
First published:

Tags: Sensex down, Share market fall

पुढील बातम्या