मराठी बातम्या /बातम्या /देश /हैदराबादच्या भाजपा बैठकीत फडणवीसांची सर्वाधिक चर्चा, पक्षाला द्यावं लागलं स्पष्टीकरण

हैदराबादच्या भाजपा बैठकीत फडणवीसांची सर्वाधिक चर्चा, पक्षाला द्यावं लागलं स्पष्टीकरण

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये (BJP working committee meeting) हैदराबादमध्ये होत आहे. या बैठकीच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीच सर्वाधिक चर्चा आहे.

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये (BJP working committee meeting) हैदराबादमध्ये होत आहे. या बैठकीच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीच सर्वाधिक चर्चा आहे.

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये (BJP working committee meeting) हैदराबादमध्ये होत आहे. या बैठकीच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीच सर्वाधिक चर्चा आहे.

मुंबई, 2 जून : महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून वेगवान राजकीय घडामोडी (Maharashtra Political Development) घडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन भाजपाच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले आहे. राज्यातील या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये (BJP working committee meeting) हैदराबादमध्ये होत आहे. या बैठकीची औपचारिक सुरूवात आज (शनिवार) होत असली तरी बैठकीसाठी प्रमुख नेते शहरामध्ये दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. बैठकीच्या आदल्या दिवशी बैठकीच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची सर्वाधिक चर्चा होती.

फडणवीसांची चर्चा का?

देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिलेल्या आदेशानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. या सर्व प्रकरणात फडणवीस नाराज असल्याची चर्चा आहे. मुंबईत सत्ताबदलानंतर भाजपानं आयोजित केलेल्या जल्लोष कार्यक्रमालाही फडणवीस अनुपस्थित होते. त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी. रवी यांना बैठकीच्या ठिकाणी फडणवीसांच्या नाराजीवरच प्रश्न विचारण्यात आले.

'आम्ही सर्व भाजपाचे कार्यकर्ता आहोत. पक्षानं दिलेल्या निर्देशांचं आम्ही पालन करतो. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष (जेपी नड्डा) यांनी ही सूचना केली होती. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांचा आदर करतो. फडणवीस देखील निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी पक्षाच्या निर्देशांचं पालन केलं आहे. आम्ही लहान मोठा असा फरक करत नाही. ' असे रवी यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे सरकार उर्वरित अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल यामध्ये कोणतीही शंका नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.

ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं शक्तिप्रदर्शन, पंतप्रधानही येणार

महाराष्ट्राच्या विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. 3 जुलै रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, तर 4 तारखेला शिंदे सरकारची बहुमत चाचणी आहे. महाराष्ट्रातील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हैदराबादच्या बैठकीला उपस्थित राहणार का? या प्रश्नाचे थेट उत्तर देणे रवी यांनी यावेळी टाळले.

First published:
top videos

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Hyderabad