मराठी बातम्या /बातम्या /देश /

Jammu and Kashmir: 370वं कलम हटविल्यानंतर भाजपने जिंकली पहिलीच निवडणूक

Jammu and Kashmir: 370वं कलम हटविल्यानंतर भाजपने जिंकली पहिलीच निवडणूक

वेगळी नैसर्गिक परिस्थिती असलेला हा भाग आहे. त्यामुळे लेह-लडाखकडे कायम दुर्लक्ष केलं गेलं असंही भाजपने म्हटलं होतं.

वेगळी नैसर्गिक परिस्थिती असलेला हा भाग आहे. त्यामुळे लेह-लडाखकडे कायम दुर्लक्ष केलं गेलं असंही भाजपने म्हटलं होतं.

वेगळी नैसर्गिक परिस्थिती असलेला हा भाग आहे. त्यामुळे लेह-लडाखकडे कायम दुर्लक्ष केलं गेलं असंही भाजपने म्हटलं होतं.

  • Published by:  Ajay Kautikwar
नवी दिल्ली 26 ऑक्टोबर: जम्मू आणि काश्मीरमधून 370वं कलम हटविल्यानंतर भाजपने लडाखमध्ये झालेली पहिलीच स्थानिक निवडणूक जिंकली आहे. लडाख (Ladakh)  स्वायत्त पर्वतीय विकास परिषद (Ladakh Autonomous Hill Development Council election) च्या निवडणुकीत भाजपने हा विजय मिळवला. भाजपला 15 तर काँग्रेसला 9 जागा मिळाल्या आहेत. तर 2 जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. LAHDCच्या या निवडणुकीत 26 जागांवर निवडणूक झाली होती. लेह आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यात भाजपने बाजी मारली आहे. गुरुवारी ही निवडणूक झाली होती. त्यात 65.07 टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीत 94 उमेदवार उभे होते. कोविडमुळे मतदानाच्या वेळी खास काळजी घेण्यात आली होती. लेह आणि लडाखमध्ये तसं कायम भाजपचं वर्चस्व राहिलेलं आहे. या भागावर आत्तापर्यंत कायम अन्याय झाला होता असंही भाजपने 370वं कलम हटवितांना म्हटलं होतं. आत्तापर्यंत सगळा भर हा फक्त जम्मू आणि काश्मीर खोऱ्यावरच दिला गेला. मात्र  वेगळी नैसर्गिक परिस्थिती असलेला हा भाग आहे. त्यामुळे लेह-लडाखकडे कायम दुर्लक्ष केलं गेलं असंही भाजपने म्हटलं होतं. मेहबुबा मुफ्तींविरोधात आंदोलन PDPच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना त्यांचं राष्ट्रध्वजाबद्दल दिलेलं वक्तव्य चांगलच महागात पडण्याची शक्यता आहे. काश्मीरचं 370वं कलम आणि ध्वज पुन्हा बहाल झाल्याशीवाय मी तिरंगा फडकविणार नाही असं मुफ्ती म्हणाल्या होत्या. त्या वक्तव्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. आता त्यांच्या पक्षातूनच त्याविरोधात आवाज निघाला असून तीन नेत्यांनी पक्षाचा राजीनामा देत बंडाचं निशाण फडकवलं आहे. ‘अजित पवार 5 दिवसांमध्ये पुन्हा कामाला लागतील’, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती टी.एस बाजवा, वेद महाजन आणि हुसेन वाफा या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. तुमची काही वक्तव्य आणि निर्णय हे आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळे देशभक्तीच्या भावनांना ठेच लागली आहे. त्यामुळे पक्षात राहणं आम्हाला शक्य नाही असं या नेत्यांनी मुफ्ती यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. भाजपचेही आंदोलन जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 (Article 370) पुन्हा लागू होईपर्यंत ना निवडणूक लढवणार, ना तिरंगा हातात घेणार' असं म्हणत माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत. महबूबा मुफ्ती यांच्या राष्ट्रध्वजावरील वक्तव्यानंतर भाजप (BJP) कार्यकर्ते नाराज झाले आहेत. तयार राहा! नोव्हेंबरमध्येच Oxford ची कोरोना लस मिळण्याची शक्यता महबूबा यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी श्रीनगर ते कुपवाडा तिरंगा यात्रा काढली. एवढंच नाही तर श्रीनगर येथील प्रसिद्ध लाल चौकात तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी भाजपच्या चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
First published:

Tags: Article 370, BJP

पुढील बातम्या