तयार राहा! नोव्हेंबरमध्येच Oxford ची कोरोना लस मिळण्याची शक्यता
भारतात ज्या ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीचं (oxford corona vaccine) ट्रायल सुरू आहे, त्याबाबत गूड न्यूज मिळाली आहे.
|
1/ 6
कोरोना लस (corona vaccine) कधी येणार याची प्रतीक्षा असताना ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीबाबत (oxford corona vaccine) गूड न्यूज मिळते आहे.
2/ 6
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (oxford university) आणि अॅस्ट्राझेनका कंपनीने (AstraZeneca) तयार केलेली कोरोना लस तयार नोव्हेंबरमध्येच मिळण्याची शक्यता आहे. या लशीत भारताच्या सीरम इन्स्टिट्युटची (serum institute of india) भागीदारी आहे.
3/ 6
या लशीचं सध्या ट्रायल सुरू आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. वयस्कर आणि तरुण दोन्ही वयोगटातील व्यक्तींमध्ये या लशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली.
4/ 6
ही लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये अँटिबॉडी आणि टी-सेलची निर्मिती झाली आहे. वयस्कर व्यक्तींवर याचा दुष्परिणामही कमी पाहायला मिळाला आहे.
5/ 6
लंडनमधील रुग्णालयांना कोरोना लशीसाठी तयारी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. द सनच्या बातमीचा हवाला देत रॉयटर्सने हे वृत्त दिलं आहे.
6/ 6
रिपोर्टनुसार लवकरच रुग्णालयांना कोरोना लशीची पहिली बॅच पुरवली जाईल, असं सांगण्यात आलं आहे.