अलीगढ, 28 नोव्हेंबर : भाजपच्या महिला मुस्लिम नेत्या रुबी आसिफ खान या अनेकदा चर्चेत असतात. घरात गणपतीची स्थापन केल्यापासून ते नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. यानंतर आता त्यांनी एक वक्तव्य केले आहे, ज्यामुळे पुन्हा त्या चर्चेत आल्या आहेत.
काय म्हणाल्या भाजपच्या महिला मुस्लिम नेत्या रुबी -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रबोधनपर परिषदेने हिंदू-मुस्लिम ऐक्य अधिक दृढ झाल्याचे रुबी यांनी म्हटले आहे. तसेच त्या जाहीर सभेला अनेक मुस्लिम गेले होते. त्या पुढे म्हणाल्या की, आता मुस्लिम समाजातील लोकांना हे समजू लागले आहे की भगवान श्रीराम आमचे पैगंबर होते आणि सनातन धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
रुबी म्हणाल्या की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आगमनाने प्रबुद्ध परिषदेत मुस्लिम समाजातील लोकांनी जय श्री रामचा नारा दिला. जय श्री रामचा नाद ऐकून त्यांनाही आनंद होतो. रुबी म्हणाल्या की, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जे उदाहरण घालून दिले आहे, ते आज मुस्लिम समाजातील लोकांना कळत आहे. रुबी आसिफ खान म्हणाल्या की, सनातन धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व भेदभाव दूर केले आहेत.
हेही वाचा - तंत्र साधनेसाठी प्रसिद्ध कामाख्या देवीची ही वैशिष्टे खूप कमी लोकांना माहीत
मुस्लिम कट्टरता वाद्यांकडून जिवंत जाळण्याची धमकी -
मुस्लीम समाज जागा झाला आहे हे विरोधी पक्षांना कळायला हवे, असेही रुबी म्हणाल्या. त्यांचे रक्षण भाजपच करू शकते हे या समाजाला कळून चुकले आहे. रुबी यांनी गणेश चतुर्थीला गणेश मूर्तीची स्थापना केली होती आणि नवरात्रीमध्ये उपवास ठेवले होते. यानंतर मुस्लिम कट्टरतावाद्यांनी त्यांना जिवंत जाळण्याची धमकीही दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Hindu, Uttar pradesh news, Yogi Aadityanath