रीवा, 18 मे: मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधित रुग्णांची (Corona cases) संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशात भाजपचे अनेक राजकीय नेते (BJP leader) अजब गजब वक्तव्य (Statement) करताना दिसत आहेत. अशात मध्य प्रदेशातील भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा (MP Janardhan Mishra) यांनी भलतीच सेवा केली आहे. कोविड सेंटरला दिलेल्या भेटीदरम्यान तेथील शौचालय अस्वच्छ दिसल्यानं संबंधित भाजप खासदारानं स्वतः च्या हातानं हे शौचालय स्वच्छ (cleaned toilet in Covid Center) केलं आहे. त्यांच्या या कारनाम्यामुळे त्यांची सोशल मीडियात जोरात चर्चा सुरू आहे.
मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले भाजप खासदार जनार्दन मिश्रा सोमवारी मऊगंज जनपद तालुक्यात दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील विविध कोविड केंद्रांना भेटी दिल्या आणि परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान त्यांनी कुंज बिहारी येथील कोविड सेंटरलाही भेट दिली. यावेळी येथील शौचालय अस्वच्छ असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. पण त्यानंतर त्यांनी गांधीगीरी करत स्वतः शौचालय स्वच्छ करायला घेतलं.
यावेळी त्यांना शौचालय स्वच्छ करण्याचा ब्रश न मिळाल्यानं त्यांनी हातात हातमोजे घालून शौचालय साफ केलं आहे. यावेळी त्यांचे अनेक कार्यकर्ते त्याठिकाणी उपस्थित होते. यातील एका कार्यकर्त्यानं या घटनाक्रमाचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यानंतर त्यांच्या कामाचं कौतुक सोशल मीडियावर देखील व्हायला सुरू झाली.
हे ही वाचा- गोमूत्र, शेणामुळे बरा होईल कोरोनाव्हायरस, भाजप आमदाराचा अजब दावा
विशेष म्हणजे, खासदार मिश्रा स्वच्छतेच्या बाबतीत अनेकदा चर्चेत आले आहेत. अगदी राष्ट्रीय माध्यमांनी देखील त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. तसेच त्यांच्या स्वच्छता मोहिमेचं कौतुकंही केलं आहे. यापूर्वीही खासदार मिश्रा संसर्गग्रस्त रुग्णांच्या घरोघरी जावून त्यांची विचारपूस केली होती. शिवाय कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांना कोविड वॉर्डात जाऊन साफसफाई करण्याची परवानगी मागितली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या स्वच्छतेप्रति समर्पणाचं कौतुक केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Covid centre, Madhya pradesh