नवी दिल्ली 23 ऑगस्ट : अफगाणिस्तान तालिबानने आपल्या ताब्यात घेतल्यानंतर (Taliban took over Afghanistan) संपूर्ण जगाचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं आहे. काही देशांनी सरळ तालिबान्यांना पाठिंबा दिला आहे, तर काहींनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. तालिबानच्या या कृतीचे जसे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटले आहेत, तसेच भारताच्या अंतर्गत राजकारणामध्येही यामुळे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची (West Bengal violence) तुलना तेथील भाजप नेते सातत्याने तालिबानी (TMC compared with Taliban) कारवाईशी करत आहेत. यातच, पश्चिम बंगालमधील भाजपच्या महासचिवांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जींवर (BJP attacks on Mamata) निशाणा साधला आहे.
भाजपचे बंगाल राज्याचे महासचिव सयांतन बसू (Sayantan Basu) यांनी ‘लेडी तालिबान (Lady Taliban) पाहायचं असेल, तर कालीघाटमध्ये या’ अशा शब्दांमध्ये ममतांवर टीका केली आहे. दांतन शहरात दोन भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती, याबाबत बोलताना त्यांनी तृणमूलवर बरेच आरोप (Sayantan Basu on TMC) केले. ते म्हणाले, की “तूणमूल सत्तेत आल्यापासून विरोधी पक्षांच्या सर्व अधिकारांवर गदा आणली जात आहे. बंगालमध्येही तालिबानी शासनच (Taliban in Bengal) सुरू आहे. जर कोणाला तालिबान पहायचं असेल, तर काबुलला जाण्याची गरज नाही. इथे कालीघाटमध्येच तुम्ही लेडी तालिबानला (Lady Taliban in Kalighat) पाहू शकाल.” कालीघाटमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचं निवासस्थान आहे. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
24 तासात 400 भारतीय मायदेशी; अफगाणिस्तानात अडकलेल्यांना भारतानं केलं एअरलिफ्ट
यासोबतच, त्रिपुरामधील तृणमूल काँग्रेसच्या (TMC) रक्षाबंधन उत्सवालाही बसू यांनी लक्ष्य केलं. ते म्हणाले, की तृणमूलने वर्षाचे 365 दिवस जरी रक्षाबंधन साजरं केलं, तरी त्याने काय फरक पडणार आहे? त्यांनी तर अफगाणिस्तानला (TMC Afghanistan Raksha Bandhan) जाऊनही रक्षाबंधनाचा सण साजरा करावा. यावर प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चॅटर्जी (Parth Chatterjee) म्हणाले, की भाजप नेत्यांनी अशी विधाने केल्यास तृणमूल ते सहन करणार नाही. याचं आम्ही वेळीच योग्य उत्तर देऊ.
Corona Up्date : तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा, रोज सापडणार 4 लाख रुग्ण - निती आयोग
दरम्यान, भाजपच्या काही नेत्यांकडून उत्तर बंगाल हे वेगळं राज्य घोषित (Separate North Bengal) करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर बोलताना बसू म्हणाले, की “ही काही नेत्यांची वैयक्तिक मागणी आहे. अशी मागणी करणं चुकीचं नाही. बिहारमधून झारखंड वेगळं करण्याची यापूर्वी मागणी करण्यात आली होती, मध्यप्रदेशमधून छत्तीसगडही असंच वेगळं झालं आहे. सध्या होत असलेली मागणीही अशीच असली, तरी ती वैयक्तिक आहे. पक्षाचा या मागणीशी काहीही संबंध नाही. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी पश्चिम बंगालची जी भौगोलिक सीमा तयार केली होती, तीच कायम रहावी अशी पक्षाची भूमिका आहे.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mamata banerjee, Taliban, West Bengal bjp