मराठी बातम्या /बातम्या /देश /Drugs Case : भाजपा नेत्याच्या वडिलांनीच दिली पोलीसांना मुलीची माहिती? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Drugs Case : भाजपा नेत्याच्या वडिलांनीच दिली पोलीसांना मुलीची माहिती? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या भाजपा (BJP) युवा मोर्चाच्या नेत्या पामेला गोस्वामी (Pamela Goswami) यांनी पक्षातील सहकारी राकेश सिंह (Rakesh Singh) यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला आहे. मात्र, या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या भाजपा (BJP) युवा मोर्चाच्या नेत्या पामेला गोस्वामी (Pamela Goswami) यांनी पक्षातील सहकारी राकेश सिंह (Rakesh Singh) यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला आहे. मात्र, या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या भाजपा (BJP) युवा मोर्चाच्या नेत्या पामेला गोस्वामी (Pamela Goswami) यांनी पक्षातील सहकारी राकेश सिंह (Rakesh Singh) यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला आहे. मात्र, या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा ...

कोलकाता, 22 फेब्रुवारी : ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या भाजपा (BJP) युवा मोर्चाच्या नेत्या पामेला गोस्वामी (Pamela Goswami) यांनी पक्षातील सहकारी राकेश सिंह (Rakesh Singh) यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला आहे. मात्र, या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पामेलाच्या वडिलांना त्यांची मुलगी ड्रग्जच्या (Drugs) व्यसनात अडकली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांची कोलकाता पोलिसांना (Kolkata Police) पत्र लिहून याची माहिती दिली, अशी माहिती आता समोर येत आहे.

‘इंडिया टुडे’ मधील वृत्तानुसार पामेलाचे वडील कौशिक गोस्वामी यांनी 8 एप्रिल 2020 रोजी लाल बाजार येथील पोलीस मुख्यालयात एक सीलबंद पत्र सोपवलं होतं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लिहलेल्या पत्रामध्ये ‘माझी मुलगी ड्रग्ज अ‍ॅडिक्ट झाली आहे, असं वाटत आहे,’ असा उल्लेख केला होता. प्रबीर कुमार डे (Prabir Kumar De) नावाचा एक व्यक्ती तिला ड्रग्जचा पुरवठा करतो, असा दावाही या पत्रात करण्यात आला होता. या पत्राची एक प्रत कोलकाता पोलीस कमिशनर आणि जॉईंट सीपी (क्राईम) यांनाही पाठवण्यात आली होती.

काय आहे पत्रात?

कौशिक गोस्वामी यांनी या पत्रात पामेला आणि प्रबीर डे यांच्यातील मैत्रीचा उल्लेख केला आहे. ‘प्रबीर डे शी पामेलाची अलिकडच्या काळात मैत्री झाली आहे. तो 42 वर्षांचा असून त्याला 8 वर्षांची एक मुलगी देखील आहे. प्रबीर आणि पामेला यांनी एकत्र येऊन एक कंपनी देखील उघडली आहे. प्रबीर कुमारनंच पामेलाला ड्रग्जचं व्यसन लावलं. तो रोज पामेलाला ड्रग्ज देत होता.’

( वाचा : भाजपची महिला कार्यकर्ती ड्रग्जच्या आहारी; पोलिसांना कारमध्ये सापडलं लाखोंचं कोकेन )

'लग्नाचं दिलं होत वचन'

‘प्रबीरचं लग्न झालेलं असूनही त्यानं पामेलाला लग्न करण्याचं वचन दिलं होतं,’ असा दावाही या पत्रात करण्यात आलं आहे. ‘आपण दोघांनाही खूप समजावलं पण त्यांनी ऐकलं नाही. प्रबीरनं त्याच्या पत्नीला घटस्फोट देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण त्यानं आजवर घटस्फोट दिलेला नाही,’ असंही त्यांनी या पत्रात म्हंटलं आहे.

'संपत्तीमधून बेदखल करण्याची तयारी'

कौशिक गोस्वामी यांनी या पत्रात आपल्या मुलीला संपत्तीतून बेदखल करण्याचीही आपली तयारी असल्याचं म्हंटलं आहे. ‘मुलीनं चुकीचा मार्ग सोडला नाही, तर तिचा आपल्या संपत्तीवर काहीही अधिकार नसेल,’ असं त्यांनी म्हंटलं होतं. या पत्रानंतर कोलकाता पोलीस मागील दहा महिन्यांपासून पामेलावर पाळत ठेवून होते, अखेर तिला आता अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

First published:

Tags: BJP, Case in india, Drugs, India, Kolkata, West bengal