अलीपूर, 19 फेब्रुवारी: बॉलीवूड ड्रग्स प्रकरण (Drugs Case) ताजं असतानाच राजकारणातलं ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका युवा महिला कार्यकर्तीला (Youth Activist) आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. रस्त्यावर गाड्यांची तपासणी सुरू असताना संबंधित महिला कार्यकर्त्याच्या कारमधून लाखो रुपयांचा अवैध कोकेन (Cocaine) पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या युवा कार्यकर्तीला आणि तिच्या एका साथीदाराला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
भाजप युवा मोर्चाच्या पर्यवेक्षक आणि हुगली जिल्ह्याच्या महासचिव (hugali district general secretary) पामेला गोस्वामी (Pamela Goswami) यांना कोलकात्याच्या नवीन अलीपूर येथून अटक (Arrest) करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून लाखो रुपयांचा अवैध कोकीन जप्त केलं आहे. यावेळी पोलिसांनी पामेला गोस्वामी यांच्या प्रबीर कुमार डे (Prabir Kumar dey) या साथीदारालाही अलीपूर परिसरातील एनआर एव्हेन्यु येथून अटक केली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.
हे ही वाचा-KGF स्टार यशच्या चाहत्यानं केली आत्महत्या; पत्र पाहून अभिनेत्यालाही कोसळलं रडू
भाजपाची युवा कार्यकर्तीला नशेच्या आहारी गेल्याची माहिती पोलिसांना अगोदर पासूनच होती. पोलिसांनी रस्त्यावर तपासणी सुरू असताना पामेला यांची कार थांबवली. यावेळी त्यांच्या कारची आणि बॅगची झडती घेतली असता. पोलिसांना 100 ग्रॅम अवैध कोकेन मिळालं. या कोकेनची बाजारात लाखो रुपये किंमत आहे. यावेळी तिच्यासोबत केंद्रीय सुरक्षा दलातील एक जवानही होता. या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का? यासाठी सखोल तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Drugs, Kolkata, West bangal