मराठी बातम्या /बातम्या /देश /'काश्मीरनंतर आता लाहोरच्या किल्ल्यावरही तिरंगा फडक राहो...' भाजप नेत्याचं Tweet चर्चेत

'काश्मीरनंतर आता लाहोरच्या किल्ल्यावरही तिरंगा फडक राहो...' भाजप नेत्याचं Tweet चर्चेत

पंतप्रधान मोदींनी फाळणीच्या वेदनांचं स्मरण करण्यासाठी 'विभाजन विभाषिका स्मृती दिवस' (Partition Horrors Remembrance Day) म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा केली आणि त्यानंतर महाराष्ट्राचे सहप्रभारी असलेल्या भाजप नेत्याचं हे Tweet चर्

    भोपाळ, 14 ऑगस्ट: 'आज काश्मीरच्या शिखरांवर पूर्ण सन्मानाने तिंरगा फडकतो आहे, तसा लाहोरच्या किल्ल्यावरही (Lahore fort) एक दिवस फडकत राहो, अखंड भारताचं स्वप्न पूर्ण होवो', अशा शब्दांत भाजप नेते जयभान सिंह पवैया (Jaibhan singh Pawaiya) यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा (Independence Day greetings) दिल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला (Independence day) जयभान सिंह यांचं चे ट्वीट चर्चेत होतं. पवैया हे महाराष्ट्र भाजपचे (maharashtra bjp)सहप्रभारी आहेत.

    कोण आहेत पवैया?

    जयसिंह पवैया हे सध्या महाराष्ट्र भाजपचे सहप्रभारी आहेत. ते मध्य प्रदेश मंत्रिमंडळातही आहेत. बाबरी मशीदप्रकरणातल्या केसमध्ये पवैया यांच्याविरोधातसुद्धा गुन्हा नोंदवलेला होता.

    'फाळणीची वेदना कधीही विसरणे शक्य नाही', पंतप्रधानांनी केली मोठी घोषणा

    विनय कटियार यांच्यानंतर बजरंग दलाचे ते अध्यक्ष होते. पूर्ण वेळ संघाचे कार्यकर्ते, प्रचारक, बजरंग दल ते भाजप कार्यकर्ते, मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

    स्वतंत्रता दिवस की पूर्व संध्या पर बीजेपी नेता जयभान सिंह का ट्वीट

    स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना या जयभानसिंह यांनी म्हटलं आहे की, 'आज काश्मीरच्या शिखरांवर तिरंगा पूर्ण सन्मानाने फडकू लागला आहे. हे भारत माते, आम्हा अशी शक्ती आणि युक्ती दे की एक 15 ऑगस्ट लाहोरच्या किल्ल्यावरसुद्धा वंदे मातरम ऐकू येईल आणि अखंड भारताचं स्वप्न पूर्ण होईल.'

    दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 14 ऑगस्टला फाळणीच्या कटू स्मृतींची आठवण करून दिली आहे. मोदी या दिवशी (PM Narendra Modi on partition) चांगलेच भावुक झाले आहेत.

    पंतप्रधानांनी ट्विट करत 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या वेदनांचं स्मरण करण्यासाठी 'विभाजन विभाषिका स्मृती दिवस' (Partition Horrors Remembrance Day) म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा केली आहे. या कृतीमुळे देशातील भेदभावाचे विष कमी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

    First published:

    Tags: BJP, Independence day, Lahore