नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : भारताच्या फाळणीचा दिवस म्हणजे 14 ऑगस्ट. याच दिवशी 1947 साली भारताची फाळणी (Partition of India) होऊन पाकिस्तान (Pakistan) या नव्या देशाची निर्मिती झाली. भारताच्या फाळणीचा इतिहास रक्तरंजित आहे. या फाळणीमध्ये हजारो लोकं मारली गेली, तसंच लाखो जणांना आपलं घर-दार सोडून अंगावरच्या कपड्यासह विस्थापित व्हावं लागलं. फाळणीच्या या कटू आठवणीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) चांगलेच भावुक झाले आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट करत 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या वेदनांचं स्मरण करण्यासाठी 'विभाजन विभाषिका स्मृती दिवस' (Partition Horrors Remembrance Day) म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा केली आहे. या कृतीमुळे देशातील भेदभावाचे विष कमी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मोदींनी म्हंटले आहे की, 'देशाच्या फाळणीची वेदना विसरणे अशक्य आहे. द्वेष आणि हिंसा या कारणामुळे आपल्या लाखो भावंडांना विस्थापित व्हावं लागलं. अनेकांनी जीव गमावला. त्यांचा संघर्ष आणि आठवण म्हणून 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभाषिका स्मृती दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य, आणि दुर्भावना याचे विष संपवण्यासाठी प्रेरणा देईल. त्याचबरोबर एकता, सामजिक सलोखा आणि मानवी संवेदना देखील यामुळे मजबूत होईल.'
#PartitionHorrorsRemembranceDay का यह दिन हमें भेदभाव, वैमनस्य और दुर्भावना के जहर को खत्म करने के लिए न केवल प्रेरित करेगा, बल्कि इससे एकता, सामाजिक सद्भाव और मानवीय संवेदनाएं भी मजबूत होंगी।
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2021
गोव्यात राष्ट्रध्वज फडकवण्यापासून नौदलाला रोखलं, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
ब्रिटीशांनी 1947साली भारत सोडताना देशाची फाळणी केली. मुस्लीम बहुल पाकिस्तान या नव्या देशाची निर्मिती त्यांनी केली. त्यानंतर इतिहासातील सर्वात मोठे विस्थापन झाले. त्या घटनेच्या वेदना आजही जिवंत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Independence day, Pm narenda modi